Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

बंधन प्रोडक्शन (योगेश ठाकूर) चे "मेरे भोले"नंतर "आये गणपती बाप्पा" हे हिंदी अल्बम साँग यूट्यूब वर प्रदर्शित,प्रविण लाड यांच्यासोबत श्रावण महिन्यातील दुसरे गाणं..!



जळगाव प्रतिनिधी :- योगेश भोई 
  
जळगाव येथील बंधन प्रोडक्शन (योगेश ठाकूर) प्रस्तुत " आये गणपती बाप्पा " हे हिंदी ऑफाईसियल साँग काल म्हणजेच दिनांक २१ ऑगस्ट २०२० रोजी बंधन प्रोडक्शन या ऑफिसियाल यूट्यूब चॅनल वर रिलीज झाले असून त्यात अमेय जोशी आणि प्रदीप भोई यांचे दिग्दर्शन आहे. गीत आणि स्वर हे अमळनेर येथील गायक निलेश देवगाडे यांचे आहे. अमळनेर येथील एका गरीब कुटुंबातील ह्या मुलाने एवढ्या चांगल्या गाण्याचे गायन करून आपला आवाज लोकांना काळजात भिळेल असे काम केले आहे.
          
सोबतच या गाण्याचे चित्रीकरण जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कॅमेरामन श्री. योगेश ठाकूर यांनी केले असून संगीत रुपेश मेहरा यांनी दिले आहे.
            
श्रावण महिन्यातील बंधन प्रोडक्शन यांचे हे दुसरे गाणे " मेरे भोले " या गितानंतर " आये गणपती बाप्पा " या आगळ्यावेगळ्या गणपतीच्या गण्यामध्ये " वावर हे तर पॉवर हाय " फेम प्रविण लाड व गायत्री ठाकूर यांच्यासोबत प्रदीप भोई, आरती गोळीवाले, अनुराधा मगरे, अक्षय राजपूत  व ज्येष्ठ कलाकार श्री. भास्कर जूनगडे यांनी काम केले आहे. तसेच प्रविण लाड यांनी या गाण्यामध्ये एका पंजाबी व्यक्तीची भूमिका केली आहे, मेरे भोले च्या आगळ्यावेगळ्या भूमिकेनंतर आता ते दुसऱ्या भूमिकेतून (पंजाबी) लोकांसमोर आले आहेत. नेहमीच कोणत्यातरी नवीन भूमिकेतून ते प्रेक्षकांची मने जिंकत असतात.
           
" आये मेरे बाप्पा " या गाण्याचे चित्रीकरण फक्त एकाच दिवसात व एकाच लोकेशन वर म्हणजेच " चिंचोली " या गावात पूर्ण झाले असून अतिशय चांगल्या प्रकारचे हे अध्यात्मिक गाणं बंधन प्रोडक्शन यांनी लोकांसमोर फार छान पद्धतीने मांडलेल आहे. 
           
गाण्यांमधून गणपती बाप्पा चा सण हा सर्व धर्माचे लोक साजरा करत असतात मग ते गरीब व्यक्ती असो की श्रीमंत ,हिंदू असो की मुस्लिम , प्रत्येकाला बाप्पा आवडतो आणि याहेतूने विविध जाती धर्माचे लोक एकत्रित सोबत येतात हेच या गण्यामधून दिग्दर्शकाला दाखवायचे आहे.
           
गाण्याला लागणारे व्यवस्थापन तेजस घुगे (MY-T MUSIC),राहुल पाटील,मयुर वाघ,योगेश वाघ, निलेश वाघ , मॉन्टी , प्रदीप भोई, प्रविण लाड व पद्मा डोंगरे जोशी यांनी केले होते, यासोबतच सौभाग्य सेनापती, मोंस्टर सेम (सागर डी. तायडे),रुपेश भाकरे व शौर्य सपकाळे ह्यांचा प्रॉडकशन्स टीम मध्ये सहभागी होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध