Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

मनसेचा महावितरण कार्यालयाला इशारा..!



नळदुर्ग शहरातील विविध ठिकाणी विजेचे पोल उभे केले आहेत,ते उभे करीत असताना त्यामध्ये सीमेंट कॉन्क्रीट केले नाही,यामुळे भविष्यातिल धोका लक्षात घेता व विजेचा खोळबा होउ नये म्हणून पोल उभे करीत असताना त्याला सीमेंट कॉन्क्रीट करून उभे करावेत अशी मनसेनी महावितरण कार्यायलयाला सूचना केली होती.

पण त्याकडे दुर्लक्ष करून महावितरण बेजबाबदारपने हे सर्व पोल तसेच उभे केले आहेत,म्हणून हे पोल सीमेंट कॉन्क्रीट करून मजबूत करावेत व तसेच कोरोनाच्या पाश्वभूमिवर मार्च महिन्यापासुन लॉकडाउन होते,

आशा परिस्थितीत सर्व सामान्यावर आर्थिक दृष्टया मोठा परिणाम झाला आहे,आशा वेळेस विजेचे तीन-चार महिन्याचे बिल एकदम आले आहे,तरी त्या ग्राहकाना विज बील भरन्यासाठी हप्ते पाडुन द्यावेत व विजबिल भरण्याअभावी त्यांचे कनेक्शन तोड़ू नयेत अन्यथा नळदुर्ग शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्य.अभियंता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला,यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलीम शेख़, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, सचिव भाऊराज कांबळे, उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध