Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १० ऑगस्ट, २०२०
जळगांव जनता बँकेच्या अभिनय उपक्रम फिरत्या 'एटीएम' उपक्रमाचे सर्वत्र कौतुक..!
धुळे प्रतिनिधी:शहरात कोरोना प्रादुर्भावामुळे बांकिंग व्यवस्थेवर देखील मोठा परिणाम झाला आहे.अनेक काही बँका या कंटेनमेंट झोन मध्ये अडकल्याने हे व्यवहार ठप्प झाले आहेत.
सर्व सामान्य खातेधारकांचे दैनंदिन व्यवहार अनेक दिवसांपासून बंद आहेत.खात्यात पैसे आहेत.मात्र शहरातील बरीच एटीएम रोकड अभावी बंद असल्याने नागरिकांना अनेक दिवसांपासून अडचणी निर्माण होत आहेत.मात्र जळगांव जनता सहकारी बँकेच्या शाखेने कठीण परिस्थितीत खातेधारक व इतर ग्राहकांची गरज लक्षात घेता फिरत्या एटीएम व्हॅनची संकल्पना डोळ्यासमोर ठेवत आज शहरातील श्री महाराणा प्रताप चौकात सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
सदर सेवेचे उद्घाटन बँकेचे धुळे येथील बँकेचे संचालक श्री रवि बेलपाठक सीए. श्री. श्रीराम देशपांडे,श्री.महेश घुगरी,सीए.श्री.राजाराम कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बँकेचे विपणन अधिकारी श्री.भास्कर साळुंखे यांनी या फिरत्या 'एटीएम" उपक्रमाचा उद्देश व बँकेच्या विविध सेवांबद्दल माहिती विषद केली.यावेळी धुळे शहर शाखेचे शाखाधिकारी श्री.आनंदा पाटिल,अधिकारी श्री.अनूप बनछोड,श्री.रविंद्र सुर्यवंशी उपस्थित होते.
शहरात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संखेमुळे सध्या दु ४ वाजेपर्यंतच बाजारपेठ सुरु असते..त गदीच्या दृष.टीने काहिंनी एटीएमकडे धाव घेतली मात्र या ठिकाणी देखील वाढती गर्दी पाहता नागरिकांनी फिरत्या 'एटीएम' ,व्हॅन मधून पैसे काढून आपली गरज भागवली.ऐन कोरोना काळात जळगाव जनता सहकारी बँकेने शाखेच्या खातेधारकां बरोबरच इतर बँकच्या ग्राहकांना देखील सेवा दिल्याने ही दिलासा देणारी बाब ठरल्याचे बोलले जात होते.सदर फिरत्या 'एटीएम' व्हॅन शहरातील महाराणा प्रताप चौक, शिवतीर्थ चौक,दत्त मंदिर चौक येथे ग्राहकांना सेवा देणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा