Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
सपोनि सचिन शालीकराव साळुंखे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार..!
सपोनि सचिन शालीकराव साळुंखे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार..!
शिरपूर प्रतिनिधी:योगेश्वर मोरे शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन शालीकराव साळुंखे यांचा ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात धुळ्याचे पालक मंत्री ना. अब्दूलजी सत्तार यांच्या हस्ते covid-१९ चा प्रादुर्भाव जन्य परिस्थितीत विशेष कामगिरी केल्याबद्दल अशोचित सन्मान केला.
देशासह जगभरात कोरोना या आजाराच्या संसर्गजन्य आपत्कालीन परिस्थितीत गेल्या मार्च महिन्यापासून महाराष्ट्र प्रशासन कार्यतत्परतेने प्रयत्न करीत आहे. त्यातच लॉकडाऊन च्या काळात साथरोग प्रतिबंध कायदा लागू असतांना अवैध धंदे जोरात सुरू होते. अवैध पध्दतीने जमाव करून सुरू असलेले जुगार,झन्ना- मन्ना, देशी - विदेशी दारू विक्री, कत्तलीच्या उद्देशाने गौ तस्करी सारखे प्रकार सर्रासपणे सुरू होते. अशातच तरुण तडफदार नेतृत्वाने आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण करणारे सपोनि साळुंखे यांनी दाखवलेल्या धडाडीच्या कामगिरीने अवैध धंदेवाईकांना सडोकी पडो करून सोडले.
कोरोनाजन्य परिस्थितीत सोसिएल डिस्टनसिंग चे पालन व्हावे, ग्रामीण भागात जमाव एकत्र येऊ नये, व कोरोना ला आळा बसावा साठी कोरोना योद्धांच्या सहकार्याने कर्तव्य बजावत असतांना स्वतः ला कोरोनाची लागण झाली.
सुदैवाने कोरोनावर मात करत कर्तव्यावर हजर होत पुन्हा अवैध धंद्यांना चाप देत कर्तव्य बजावले. या कार्याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ७४ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्याने धुळ्याचे पालक मंत्री यांनी त्यांच्या विशेष कार्याची दखल घेत त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा