Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

जामनेर शहरातील लॉर्ड गणेशा इंग्लिश मेडीयम स्कूल तर्फे स्वातंत्र्यदिनी पत्रकारांना दिला कोरोना योद्धा सन्मान...!



जामनेर (प्रतिनीधी) संजय सूर्यवंशी
आज दी. 15 ऑगस्ट रोजी शहरातील मंगलमूर्ती बहुउद्देशीय संस्था संचलित लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल येथे ध्वजारोहन कार्यक्रम झाल्या नंतर पत्रकार बांधवांना कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .

कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी प्रत्येक समाज घटक आपापल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यातच पत्रकार बांधव सुध्दा संबंधित आजाराचा सर्व तपशील कशाचीही पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेपर्यंत सर्व गोष्टी पोहोचवित असतो. कोरोना या महामारी आजाराबद्दल जनजागृती व उपलब्ध सेवा, परिस्थिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत. 

याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे आम्ही आपल्या सदर कार्यास प्रोत्साहन म्हणून शाळेच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात येत असल्याची भावना संस्थेचे चे सचिव अभय बोहरा यांनी व्यक्त केल्या.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमंत
ललवाणी,सचिव अभय बोहरा,सहसचिव दीपक पाटील, संचालक प्रमोद कोठारी, अभय सांखला, ,विनोद बुळे,प्रशांत महाजन, अरुण उघडे,तैलेश बंब,धर्मेंद्र भुरट ,राहुल साबद्रा संजय भुरट यांच्यासह मुख्याध्यापक धनंजय सिंग व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश रोकडे यांनी केले.तर सुहास चौधरी, रवींद्र झाल्टे,किरण सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, भाईदास चव्हाण, पंढरी पाटील, अमोल महाजन,सुनील इंगळे, गजानन तायडे, अभिमान झाल्टे,किरण चौधरी, अनिल सिरसाठ,ईश्वर चौधरी, दादाराव वाघ, या सर्व उपस्थित पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व संस्थाचालकांचे पत्रकारांच्या वतीने रवींद्र झाल्टे यांनी सर्व पत्रकारांचा सन्मान केल्याबद्दल आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध