Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगांव कडून अभिजीत चा सत्कार..!
विदर्भातुन मातंग समाजातील पहिला आयएएस
शेगाव: (प्रतिनिधी उमेश राजगुरे मोबाईल नंबर 98 81 7946 32 ):
इलेक्ट्रॉनिक आणी टेलिकम्युनिकेशनमध्ये बीई झाल्यानंतर मोठ्या कंपन्याद्वारे
नोकरीसाठी सिलेक्शन झाले,परंतू
खासगी अभिजीत सरकटे नोकरी न करता समाजाचे ऋण फेडण्यासाठी केंदीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचे ठरवले.सतत तीन वर्ष यशाने हुलकावणी दिली. मात्र अभ्यासात सातत्य व जिद्द कायम ठेवली व अभिजीतची 'जीत' झाली. शेगावचा अभिजीत सरकटे हा विदर्भातील पहिला आयएएस ठरला आहे.सलग तीन वर्ष दररोज आठ तास अभ्यास करून अभिजीत सरकटेने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले.
अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून तसेच जिद्द आणि जिकाटीच्या जोरावर त्याने यश खेचून आणले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचे यश प्रेरणादायी आहे. अभिजीतचे वडील विश्वनाथ सरकटे वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे राज्य परीवहन महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहेत तर आई मीना सरकटे शेगाव पंचायत
समिती अंतर्गत लासूरा येथील
शाळेत शिक्षिका आहेत अभिजीतने शालेय शिक्षण शेगावात हरलालका शालेत व महाविद्यालयीन शिक्षण नगरपालिकेच्या महाविद्यालयात घेतले.
पुढे अमरावती येथे हनुमान मंडळाच्या महाविद्यालयात बीईचे शिक्षण घेतले.विद्यार्थी दशेतूनच केंद्रीय व्यायाम प्रसारक लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा त्याचा मानस होता. याच दृष्टीने नंतर त्याने खासगी क्लासमधून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन घेतले क्लासदरम्यान दिवसातून सलग आठ तास अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची तयारी केली.
अपयश आल्यानंतरही केंद्रीय लोकसेवा
आयोगाची परीक्षा देण्याची जिद्द कायम होती."अभ्यासातील सातत्य कायम ठेवले.पूर्णवेळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. २०१९ च्या केंद्रीय लोकसेवा
आयोगाच्या परीक्षेत देशभरातून
७१० व्या अनुक्रमांकाने उत्तीर्ण होऊन अभिजीतने आपल्या स्वप्नांना मूर्तरुप दिले आहे.
त्यामित्त अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगांव तर्फे विदर्भातुन मातंग समाजातील पहिला आय.ए.एस (lAS) अभिजित सरकटे यांच सत्कार करण्यात आला यावेळी विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष उमेश सिरसाट, तालुका शेगांव अध्यक्ष सचिन कडूकार, शहर अध्यक्ष सिद्धार्थ गावंडे, सचिव उमेश राजगुरे, दिनेश घाटोळ,प्रशांत खत्री,संजय ठाकूर,श्रीकांत कलोरे,आनंद जवंजाळ, संजय त्रिवेदी,राजकुमार व्यास,दिनेश कळस्कार हे उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा