Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

अत्यावश्यक वस्तूची दुकाने सकाळी 9.00 ते सांयकाळी 5.00 पर्यंत तर मेडीकल औषधाची दुकाने चालू...!



उस्मानाबाद,(राहूल शिंदे) दि.21:-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी दि. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन वाढविण्यात आले असून लॉकडाऊनमध्ये करावयाच्या कार्यवाहीबाबत आदेश जारी केलेला आहे.
      
या आदेशान्वये काही  आदेशात  दुरुस्ती करण्यात येत असून पुढीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे. सर्व अत्यावश्यक वस्तूंची (किराणा, दूध, भाजीपाला, फळे इ. जिवनावश्यक वस्तूंची दुकाने) दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील. मेडीकल, औषधी दुकाने 24 तास चालू ठेवण्यास परवानगी राहील.
      
या आदेशाची कडक अंमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तींकडुन या आदेशातील सुचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.

असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी आदेश जारी केले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध