Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

जिल्हयातील शेतकऱ्यानी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंर्तगत अनुदानाचा लाभ घ्यावा...!



उस्मानाबाद(राहूल शिंदे) दि.21:- कृषि यांत्रिकीकरण उप अभियान सन 2020-21 योजनेमध्येु कृषि यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदीसाठी अर्थसहाय्य (अनुदानावर ट्रॅक्टरर व कृषि औजारे पुरवठा )व भाडे तत्वाणवर कृषि यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषि औजारे बँक स्थापनेसाठी दिनांक. 29 जुलै-2020 पासून ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची कार्यवाही http://mahadbtmahait.gov.in  या संकेत स्थवळावर सुरु झालेली आहे.

जिल्ह्यातील इच्छुक शेतक-यांनी http://mahadbtmahait.gov.in  या संकेत स्थळावर जाऊन  कृषि यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यारसाठी, इच्छुक शेतक-यांचे अर्ज सादर करण्यारची कार्यपद्धती बाबतची माहिती पोर्टलवर “ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सुचना”  या सदराखाली देण्याात आली आहे.             
        
उस्माननाबाद जिल्हायातील इच्छु‍क शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी http://mahadbtmahait.gov.in  या संकेत स्थळावर स्वतः  किंवा सीएससी केंद्रामार्फत ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी ,कार्यालयाशी संपर्क साधावा. 

असे आवाहन जिल्हाअधिक्षक कृषि अधिकारी यु.आर घाटगे, यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध