Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
डॉ.मानसिंग पवार मुंबईला वैद्यकीय प्रतिष्ठा मिळवून देणा-या अधिष्ठात्याच्या कारकिर्दीला सलाम...!
डॉ.मानसिंग पवार मुंबईला वैद्यकीय प्रतिष्ठा मिळवून देणा-या अधिष्ठात्याच्या कारकिर्दीला सलाम...!
डॉ.राहुल शिंदे :बीड “सेंट जॉर्ज हॉस्पिटल” हे मुंबईच्या किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) जवळील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. प्रारंभी केवळ युरोपियन रूग्णांसाठीच ते पोषित असल्याने हे “युरोपियन जनरल हॉस्पिटल म्हणूनही ओळखले जात असे.” डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल हे मुंबईतील प्रमुख दंत महाविद्यालयां पैकी एक मानले जाते. 1938 मध्ये या महाविद्यालयाची स्थापना झाल्यापासून हे कॉलेज भारतातील पहिल्या तीन दंत महाविद्यालयांमध्ये बदलले गेले आहे.त्या काळी स्थापन झालेल्या या वैद्यकीय महाविद्यालयाला वैद्यकीय अधिष्ठान मिळवुन देण्याचा प्रयत्न डॉ. मानसिंग पवार यांनी केला आहे. यात दुमत असण्याचे कारण नाही.
छत्रपती शाहु महाराजांचा कोल्हापुर जिल्हा ! इतिहासाची योग्य बांधीलकी असणारा या जिल्ह्यातील पन्हाळा या गावातील ते वैद्यकीय शिक्षण घेऊन आधिष्ठता झालेले गावातले पहीलेच.अत्यंत कड़क शिस्तीचे, कर्तव्यकठोर, उपक्रमशिल आधिष्ठता म्हणुन सरांना ओळखले जाते.
वैद्यकीय महाविद्यालयाची अनेक कामे त्यांच्या कार्यकाळात पुर्ण झाली म्हणुन सेंट जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालय सरांमुळे ओळखले जाऊ लागले.याच काळात त्यांनी वैद्यकीय शिक्षण संचालनालय,मुंबई चे संचालक. भारतीय दंत परिषद,दिल्ली चे सदस्य. अॅकडमीक कौन्सील चे सदस्य , महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाचे सिनेट सदस्य, महाराष्ट्र स्टेट डेंटल कौन्सील चे अध्यक्ष, या सर्व पदांवर काम करत असताना सरांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवीला आहे.
आधिष्ठता पदाचा मान कधीच कमी होणार नाही तर अधिक उंचावत राहील, याची काळजी त्यांनी घेतली. महाविद्यालयातील वार्षीक कार्यक्रम हे शिस्तबध्दपणे पार पड़त असे. तर असे हे कर्तव्यदक्ष आधिष्ठता निवृत्त होण्यास काही दिवस राहीले असताना काही जळाऊ वृत्तीच्या लोकांनी मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. बदनामी करण्याचे प्रयत्न झाले. मात्र खंबीरपणे या सर्वांना सामोरे गेले. या अग्नी परिक्षेतुन त्यांनी हार मानली नाही.एक कौतुकाची बाब म्हणजे याच कठीण प्रसंगाच्या काळामध्ये डॉ. पवार सरांची आरोग्य विद्यापिठाच्या कुलगुरू पदासाठी पहील्या पाच मध्ये निवड झाली होती. सरांना हे पद मिळता मिळता राहीले. आभ्यासु, अनुभवी, कौशल्य, गुणवत्ता, वक्तृत्व या सर्व गोष्टी त्यांच्यात होत्या परंतु बाक़ी गोष्टीत ते कमी पडले. असे आधिष्ठता कदाचीत कुलगुरू झाले असते तर देशातील इतर विद्यापिठाप्रमाणे मोठा विकास झाला असता.
सेंट जॉर्ज दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेला आता जवळपास सत्तर वर्षाचा कालावधी पुर्ण होत आला आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाला अनेक अधिष्ठता आले आणि गेले परंतु आजपर्यंत मिळालेल्या अधिष्ठतांपैकी डॉ.मानसिंग पवार सर यांची कार्यपध्दत पाहाण्याचे भाग्य मला मिळाले आहे. डॉ. पवार सर यांचे प्रशासकीय वजन एवढे होते की, त्यांनी एखाद्या विभागात फोन केला की सर्व कर्मचारी त्यांचा आदर करून, उभे राहुनच बोलायचे कारण ते प्रत्येक विभागाची काळजी आपल्या कुटुंबाप्रमाणेच करत होते. सर्व अधिष्ठातांमध्ये डॉ. मानसिंग पवार सर यांनी या वैद्यकीय महाविद्यालयाला राज्यातच नव्हे तर संपुर्ण देशामध्ये वैद्यकीय अधिष्ठान मिळवुन दिले हे खरे आहे.
डॉ.मानसिंग पवार सर यांचे वैद्यकीय शाखेत मोलाचे योगदान आहे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान एक्सप्लोर करण्याची उत्तम संधी उपलब्ध केली आहे. दंतशास्त्रातील अनेक तज्ञांचे मार्गदर्शन देखील आपल्याला मिळावे या दुहेरी उद्देशाने पवार सरांनी नवनवीन उपक्रम उभा केले.राज्याची राजधानी असलेल्या मुंबई मध्ये सरांनी तोंडी आजारांच्या घटनांची नोंद ठेवण्यासाठी ‘ओरल हेल्थ पॉलीसी’ हा सर्व्हे सुरू केला. या सर्वेक्षणानुसार, राज्याने तोंडी आरोग्य धोरण तयार करणे अपेक्षित आहे, जे देशातले सर्वात प्रथम प्रकारचे असेल.तोंडी आजारांचा प्रादुर्भाव वाढत असतानाही या विषयाचा कोणताही डेटा उपलब्ध नसल्यामुळे असे सर्वेक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे सरांचे म्हणणे होते .
शासकीय दंत महाविद्यालयाचे डीन डॉ. मानसिंग पवार म्हणाले, "अमेरिका आणि इतर देशांकडे तोंडी आरोग्य धोरणे आहेत, पण भारताकडे तसे नाही. या संदर्भात आम्ही सर्वेक्षण करण्याचे ठरविले." असे दुरदृष्टी असणारे सरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या कामांमुळे मुंबई शहराला एक वेगळे वैद्यकीय अधिष्ठान मिळवुन दिले. असे किती तरी मोठे आणि कधीही न सुरू झालेले उपक्रम डॉ. मानसिंग पवार सरांच्या पुढाकाराने सुरू झाले.
तुमच्या प्रेरणेने असेच आमच्यासारखे हजारो डॉक्टर घडत राहों हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
वाढदिवस आभिष्टचिंतन...!! सर, दिर्घायुषी व्हा..
तुमच्या वैद्यकीय सेवेला सलाम...!
✍️ संकलन:- राहूल शिंदे, विभागीय संपादक,उस्मानाबाद (9975114800)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा