Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
भूम पोलीसस्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेशजी साळवे साहेब कोरोना पॉझिटिव्ह...!
भूम पोलीसस्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेशजी साळवे साहेब कोरोना पॉझिटिव्ह...!
भूम (राहूल शिंदे) दि.3 ज्या पोलिसवाल्या माणसातील देवदूताने कोरोना सारख्या महामारी मध्ये सुरवातीपासून भूम तालुक्यात कोणालाही कोरोना आजार होऊ नये म्हणून दिवसरात्र,ऊन-पाऊस-वारा, स्वतः च जेवणखाणं इतकंच काय कुटुंबही बघितलं नाही.फक्त लोकांना काही होऊ नये आपलं कुटुंब मुळ गावी सोडून अहोरात्र प्रत्येक खेड्यात जाऊन कोरोना विषयी जनजागृती करण्याकरिता अहोरात्र झटत राहिले. भूम मधील गरीब, निराधार, दिव्यांग,मजूर, वाटसरू व सर्वधर्मीय लोकांसाठी लॉक डाउनच्या काळात खंबीर आधार म्हणून अक्षरशः त्यांचा देवदूत, अल्लाह का फरिश्ता बनला.
गणेशोत्सवा दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून सामान्य लोकांना त्याची झळ बसू नये म्हणून अभूतपूर्व संकल्पना जनतेसमोर मांडून, गावोगावी जाऊन त्या संकल्पनेचे लोकांना व गणेश मंडळांना महत्व पटवून देऊन संपूर्ण महाराष्ट्रात भूम तालुक्यात एकमेव एक तालुका एक गणपती असा अभिनव उपक्रम यशस्वी पणे राबविला.त्यादरम्यान समाजहितापोटी 10 हजार वृक्ष लागवड केली. रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान शिबीर आयोजित करून स्वतः रक्तदान केले.ज्यामुळे भूम तालुक्याचं नावं संपूर्ण महाराष्ट्र भर गाजलं.
सर्वांसाठी तारणहार म्हणून निम्या रात्री उभे राहणारे,सर्वसामान्य जनतेचा माणूस,सर्वांना आपलाच वाटणारा माणूस म्हणजे आपल्या भूम पोलीस स्टेशनचे मा.मंगेश साळवे साहेब यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
त्यामुळे आपण सर्वांनी मिळून साळवे साहेब रुपी भूम तालुक्याला लाभलेल्या देवदूताच्या चांगल्या आरोग्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करूया.
साहेब आपणावर संपूर्ण भूम तालुक्याचे प्रेम आणि आशीर्वाद आहेत.तुम्ही लवकरात लवकर या आजरातून बरे व्हाल.अशी माहिती पोलीस पाटील रामदास अर्जुन यांनी दिली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा