Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०
उद्योग बुडविणार्यांनी उद्योग उभारण्याविषयी सल्ले देऊ नयेत.खा.ओमराजे...!
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.2 जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची ओळख शांत,संयमी नेते म्हणून आहे.परंतू आज त्यांचा रुद्रअवतार पाहण्यास मिळाला,नेमका निशाणा कोणावर होता हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
मुख्यमंत्री व उद्योगमंत्री सक्षम आहेत. ते जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने विविध प्रश्नासंदर्भात बैठका घेत आहेत, त्यामुळे उद्योग बुडविणार्यांनी उद्योग उभारणीचे सल्ले देऊ नयेत. तुमच्या आजवरच्या कारकिर्दीचा आलेख जनतेला ज्ञात आहे. तुमचा शहाजोगपणा जनतेच्या चांगलाच लक्षात आला आहे. जिल्ह्याच्या विकासांची तुम्ही चिंता करु नका व मुख्यमंत्र्यांना सल्ले देण्याच्या भानगडीत पडु नका. उद्योग विषयावर बैठक लावण्याची विनंती करण्याअगोदर आमदारांनी थोडी माहिती घ्यायला हवी होती. उद्योगमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याच्या उद्योगाच्या प्रश्नासंबंधी बैठक पार पडली असुन त्यामध्ये सविस्तर चर्चा देखील झाली आहे.
यानंतर खास तुमच्यासाठी बैठक आयोजीत करण्याची तुमची मागणी हा निव्वळ 'विनोद'च मानला पाहिजे. आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री आहेत म्हणुनच तर आमच्या मागणीप्रमाणे त्यांनी ही बैठक बोलावली. त्यामुळं जिल्ह्याकडे त्यांनी लक्ष द्यावे असला शहाजोगपणा यापुढे बंद करावा.
तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करावी आमच्या नेतृत्वानी काय करावे एवढी तुमची पात्रता नाही हे सुध्दा लक्षात ठेवावे. नुसतं पत्रक काढुन व पोकळ विकासाच्या गोष्टी करुन जिल्ह्याचे चित्र बदलणार असते तर मागेच तुमच्या निवेदनाच्या पत्रावळ्या वरुन जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलुन गेला असता.
या जिल्ह्यावर मागासचा शिक्का ज्यांच्यामुळं बसलाय तेच आता नव्याने विकासांच्या बाबतीत बोलतायेत यापेक्षा हास्यास्पद काय असावे.
विषयच काढला म्हणुन मी जनतेला सांगतो की, जिल्ह्याच्या विविध प्रश्नासंबंधी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने व पर्यटनमंत्री यांच्या पुढाकाराने बैठका घेऊन त्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी समोर आलेल्या अडचणीची सोडवणुक करण्यासाठी त्यांनी सकारात्मक प्रयत्न देखील सुरु केले आहेत. पण आम्हाला नुसते पत्रक काढुन गाजावाजा करायची सवय नाही. जे काय होतय ते आमच्यामुळेच असला स्वभावही आमचा नाही पण विकासांच्या बाबतीत आमचं सरकार कटिबध्द असुन योग्य दिशेन काम करत आहे असा विश्वास आहे.
अशी माहिती खा.ओमराजे यांनी आपल्या अधिकृत फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा