मेष -  श्रीगणेश सांगतात की आज कुटुंबीयां समवेत घरगुती बाबींचा महत्त्वपूर्ण विचार- विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी उच्चाधिकार्‍यां सोबत महत्त्वपूर्ण मुद्दयांवर विचार- विमर्श कराल. 

वृषभ -  श्रीगणेश सांगतात की विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्याकडून बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल. परदेशी जाण्याची इच्छा असणार्‍या लोकांना अनुकूल योग आहेत.  

मिथून -  कोणत्याही प्रकारच्या आपत्तीपासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. शस्त्रकियेसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. 

कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस तुम्ही मौज- मजा आणि मनोरंजन यात गढून जाल. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत करमणूक केन्द्र किंवा पर्यटनस्थळी जाण्याची संधी मिळेल. सार्वजनिक क्षेत्रात मान मिळेल आणि व्यवसायात भागीदारीमध्ये लाभ मिळेल. 

सिंह -  श्रीगणेशांच्या मते आज घरात हर्ष आणि आनंदाचे वातावरण राहील. घरातील व्यक्तींबरोबर आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती आणि आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील. 

कन्या - आज आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचनासारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा आणि बोलाचालीत भागच घेऊ नका. 

तूळ - गणेशजी सांगतात की अतिशय संवेदनशीलता आणि विचारांचे अवडंबर यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. माता आणि स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. यात्रा प्रवासा साठी आजचा दिवस अनुकूल नसल्याने यात्रा प्रवास टाळा.

वृश्चिक -  श्रीगणेश कृपेने आजचा दिवस खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय आणि मित्रांशी सुसंवाद साधाल. जवळपासचे प्रवास होतील. सर्व कामे पूर्ण होतील. 

धनु -   आपला आजचा दिवस मध्यम फलदायी सिद्ध होईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. 

मकर - श्रीगणेश सांगतात की आजचा आपला दिवस ईश्वर नाम- स्मरणात जाईल. धार्मिक कार्यात मग्न राहाल. नोकरी व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. मान सम्मान मिळेल. नोकरीत बढतीचे योग आहेत. 

कुंभ -  पैशाचे व्यवहार तसेच जमीन- जुमला अशा व्यवहारांमध्ये कोणाला जामीन राहू नका असे श्रीगणेश सुचवितात. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. अयोग्य जागी गुंतवणूक होणार नाही याची काळजी घ्या.  

मीन -   मित्रांकडून आपणाला लाभ होईल आणि त्यांच्यावर खर्च करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र आणि वडीलधार्‍यांशी संपर्क होतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीचे नियोजन कराल. नवे स्नेह-संबंध जुळतील आणि भविष्यात त्याच्यांकडून लाभ होईल.