Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

वृक्षारोपण करून मुलाने समाजात निर्माण केला आदर्श...!



वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनी वृक्षारोपण केल्याबद्दल दिनेश भोई यांच्यासह मित्र परिवाराचे कौतुक.....!


एकीकडे म्हातारपणी आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या मुलांना आपण समाजात पाहतो तसे आयुष्यभर आईवडिलांची सेवा करणारे श्रावण बाळ आणि आपल्याला समाजात पाहायला मिळतात.

"मातृ पितृ देवो भव" या उक्तीप्रमाणे मुले आपल्या आईवडिलांच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रम घडवून आदर्श घडवितात.
नवापूर शहरात भोई समाजाच्या मुलाने आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण करून समाजात एक नवा आदर्श घडविला.

नवापूर शहरातील इंदिरानगरातील रहिवासी दिनेश भोई यांनी आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपणासह जाळी लावून वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प केला.

कै.चंदूलाल हरचद साटोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रभाकर साटोटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . वृक्षारोपण नवापूर भोई गल्ली कंपाऊंड येथे करण्यात आले. यावेळी वृक्ष संवर्धनासाठी जाळीही बसविण्यात आली. 

यावेळी भोई समाजाचे शहराध्यक्ष दिनेश भोई , तालुका सचिव चेतन मोरे , माजी तालुकाध्यक्ष अजय मोहने , प्रकाश मोरे , आकाश मोहने , किशन शिरसाठ , आकाश भोई ,वासु भोई , भुटु भोई आदी उपस्थित होते . वडिलांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन या कार्यक्रमानिमित्त दिनेश भोई व त्यांचे मित्र परिवारांचे परिसरातून तसेच समाजातून सर्वत्र कौतुक होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध