Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त जामनेर शहरात थर्मल स्कॅनिंग ठरला एक अभिनव उपक्रम एका मिनिटांत होते २०० व्यक्तीची स्कॅनिंग...चंद्रकांत बाविस्कर...!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त जामनेर शहरात थर्मल स्कॅनिंग ठरला एक अभिनव उपक्रम एका मिनिटांत होते २०० व्यक्तीची स्कॅनिंग...चंद्रकांत बाविस्कर...!
जामनेर(प्रतिनिधी) संजय सुर्यवंशी
व्यक्तीच्या शरिरातील तापमान सांगू शकणारी थर्मल स्कॅनिंग हा एक अभिनव उपक्रम असल्याचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी सांगितले.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त जामनेर शहरात आज भाजपा च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्यात विशेष आकर्षक ठरले ते 'थर्मल स्कॅनिंग'जामनेर शहरातून करोना ला हद्दपार करण्यासाठी शहरांतील प्रत्येक नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग करण्याचा निर्णय आ.गिरीश महाजन यांनी घेतला असून त्याची सुरुवात पाचोरा रोड, गणेश वाडी परिसरातून आज करण्यात आली.
पुणे येथील भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी प्रकल्प व्यवस्थापक मयूर कर्जतकर व क्षेत्र समन्वयक गौरव पानमंद आणि त्यांची टीम करत आहे. करोनाच्या या महाभयंकर आजाराला आळा घालण्यासाठी व शहरांतील व्यक्तीचे तापमान तपासण्यासाठी मोठी मदत यानिमित्ताने होत आहे. संशयित रुग्णांची लागलीच रॅपिड चाचणी करण्यात येईल करोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी याची मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने रक्तदान शिबीर व प्लाझ्मा डोनेट या कार्यक्रमात रक्तदान दात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले तर तालुक्यातून ७०जण प्लाझ्मा डोनेट करणाऱ्याची यादी प्रशासनास भाजपा च्या वतीने देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी नगराध्यक्षा सौ.साधना महाजन,दिलीप खोडपे,जितेंद्र पाटील,नवल पाटील,महेंद्र बाविस्कर,श्रीराम महाजन,अरविंद देशमुख,अमित देशमुख,अमर पाटील,रविंद्र झाल्टे,आनंदा लाव्हरे,बाबुराव हिवराळे,विलास पाटील,रमण चौधरी,सुभाष पवार,कैलास पालवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा