Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०
जवळा-मुंजेवाडी एकात्मिक पाणलोट प्रकल्पाचे उदघाटन...!
जामखेड(राहूल शिंदे)दि.18 तालुक्यातील मुंजेवाडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात झालेल्यां, "नाबार्ड पुरस्कृत आणि कृषी विकास प्रतिष्ठान, बारामती संचालित जवळा-मुंजेवाडी एकात्मिक पाणलोट प्रकल्प" उदघाटन सोहळयात सामाजिक सहभाग आधारित: प्राथमिक टप्याला आज सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी बोलताना आ.रोहित दादा पवार यांनी हा प्रकल्प जर गावातील लोकांनी पूर्ण ताकदीने राबवला तर इतरही विकास कामात झुकते माप देणार असे सांगितले.
लोक सहभागातून हा पाणलोट प्रकल्प कसा यशस्वी होऊ शकतो, तसेच, नाबार्ड राबवीत असलेल्या ग्रामीण अणि कृषी क्षेत्राशी निगडित काय काय योजना आहेत त्या संबंधी शीलकुमार जगताप (जिल्हा विकास अधिकारी अहमदनगर) नाबार्ड विस्तृत माहीत दिली.
तसेच या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, अहमदनगर आत्माचे प्रकल्प संचालक अनिल गवळी अणि जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक वालावलकर यांनी,कृषी प्रक्रीया अणि बॅंकिंग क्षेत्राशी निगडीत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोपात ग्रामस्थांनी नाबार्ड पाणलोट विकासात सहभागाचे अनुमोदन दिले. तसेच,जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे अणि मुंजेवाडीचे सरपंच बबन ठकाण यांनी.
आ.रोहित पवार यांचे हा प्रकल्प जवळा-मुंजेवाडीतच होण्यासाठी सर्वतो परी प्रयत्न केल्या बदल आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा