Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०
कुरखळीत कोरोना योद्धांचा 'ज्ञानदिपक कोरोना योद्धा' पुरस्काराने सन्मान...!
कुरखळी ग्राम सर्वांगीण विकास मंच व चिराईदेवी बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धांचा सत्कार !
शिक्षण, आरोग्य, ग्राम पंचायत व पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना ' ज्ञानदिपक कोरोना योद्धा ' पुरस्काराने सन्मानित !
शिरपूर प्रतिनिधी: ग्राम विकास तसेच शैक्षणिक विकासाचे ध्येय बाळगून दिवंगत गुरुजनांचा शिकवणीवर गुरुजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ सलग ९ वर्षांपासून अविरतपणे नवनवीन उपक्रमातून कुरखळी गावचे नाव लौकिक करणारा कुरखळी ग्राम सर्वांगिण विकास मंच आज १० व्या वर्षीच्या नियोजनात चिराईदेवी बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीच्या संकटावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे व याकाळात कर्तव्यदक्षतेने उत्कृष्टपणे काम करणाऱ्या शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांना १२ सप्टेंबर २०२० या दिवशीच्या 'ज्ञानदिपक कोरोना योद्धा, सन्मान सोहळ्यात सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमपूजनाने झाली. प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थितीतांचे स्वागत रमेश जगदेव यांनी केले.
दि १२ सप्टेंबर २००३ साली कुरखळीतील शिक्षक स्व. दिपक मुरलीधर मोरे, शिक्षिका स्व. निताबाई भगवंत मोरे, स्व. प्रमोद मुरलीधर मोरे यांचा कर्तव्यावरून घरी परतत असतांना अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला होता.
त्यांच्या अध्यापणाखाली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा स्मृतिदिनानिमित्त नवीन उपक्रमांची मोहीम राबवायला २०११ साली सुरवात केली. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी तसेच विविध क्षेत्रात बालवयापासूनच पारंगत व्हावे यासाठी उपक्रमाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबीर, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, पर्यावरण पुरक होळी, गणपती, रंगपंचमी सारखे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले जात असत.
सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीत प्रथमच विद्यार्थी विरहित व शासकीय आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करत निवड केलेल्या कोरोना योद्धांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष हे लोकनियुक्त सरपंच सिताराम फुला भिल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आय टी समन्वयक श्री मनोहर वाघ सर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील, अवधूत मोरे हे होते.
पुरस्कर्ते शिक्षण विभाग
शरदराव सुर्यवंशी - वाडी खु, मनोहरजी वाघ- तालुका IT समन्वयक, हेमंत नांद्रे - उपशिक्षक विखरण, नरेंद्र कोळी - उपशिक्षक सांगवी, बापू वाडीले - उपशिक्षक भटाने, जगदीश पाटील - उपशिक्षक शिरपूर, सौ. प्रतिभा पवार उपशिक्षिका आमोदे, दीपक पाटील - उपशिक्षक, सौ. ललिता ठाकूर - उपशिक्षिका
आरोग्य विभाग
डॉ श्री मनोज पाटील (वैद्यकीय अधिकारी - प्रा. आ. केंद्र खर्दे, प्रमुख - कोविड केअर सेन्टर शिंगावे ), डॉ रवींद्र बाविस्कर ( वैद्यकीय अधिकारी - खर्दे), श्री सोमनाथ डोंगर साळवे ( आरोग्य सहाय्यक ), श्री नारायण बंडू चौधरी ( सेवा निवृत्त आरोग्य सेवक ), श्री फुलपगारे (आरोग्य सहाय्यक ), श्रीमती संध्या नरेश मोरे ( अंगणवाडी सेविका 1), श्रीमती सिमा मोरे( अंगणवाडी सेविका 2), श्रीमती सुरेखा सुरेश मोरे ( आरोग्य मदतनीस ), श्रीमती ज्योती भरत भिल ( आशा सेविका )
पोलीस विभाग थाळनेर
श्री सचिनजी साळुंखे - सहाय्यक पोलीस निरीक्षक,पी आय नवनाथ आनंदा रसाळ, हे. कॉ. सुनील राजाराम माळी ,पोका सिराज सलीम खाटीक, पो का विजय मछिन्द्र जाधव,पो का प्रकाश हिरामण मालचे,पो का कृष्णा आत्माराम पावरा,पॉका उन्मेश सुधीर आलंदे, पो का नरेंद्र अभिमन पवार
ग्रामपंचायत
सरपंच - सिताराम फुला भिल
ग्रामसेवक - भिकन चव्हाण भाऊसाहेब
मनोगत / मार्गदर्शन
श्री मनोज पाटील - वैद्यकीय अधिकारी
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय आदेशांचे काटेकोरपणे पालन करा, मास्क, सॅनिटाईझर चा वापर करा, सामाजिक अंतर ठेवून कर्तव्य जोपासा तसेच मानसिक संतुलन डगमगू न देता खंबीरपणे लढत राहायचं आहे. स्वतः आपली व घराची विशेष काळजी
घेतल्यास कोरोनावर विजय मिळविला जाऊ शकतो,
शरदराव सूर्यवंशी - पदवीधर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष शिक्षकांप्रती कृतज्ञतापूर्वक सलग १० वर्षांपासून अविरतपणे पुण्यस्मरण सोहळ्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणे ही जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पहिलीच घटना आहे.
ज्यांना गुरुजनांचे स्वप्न त्यांच्या पश्चात माजी विद्यार्थी पूर्ण करतात ही गौरवाची बाब आहे. पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
श्री मनोहर वाघ - तालुका IT समन्वयक
दिवंगत गुरुजनांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना शिकवण व संस्कारही त्याच गुरूंनी दिले. टीवनची संस्कारामुळे आज ही आदर्शवत घटना कुरखळी गावात कुरखळी ग्राम सर्वांगीण विकास मंच च्या माध्यमातून घडणे गावाचे भाग्यच म्हणावं लागेल. शैक्षणिक व ग्रामविकासासाठी काम करणे ही देखील देशसेवाच आहे.
कोरोना योद्धांचा सन्मान करून सकारात्मक दृष्टिकोनातून अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमेश जगदेव यांनी तर प्रस्तावना माजी शिक्षक पोपट शिरसाठ यांनी केली, व आभार कुरखळी विकास मंचचे प्रमुख योगेश्वर मोरे यांनी केले. तर सदस्य जितेंद्र मोरे, हर्षल मोरे, दिनेश मोरे, चेतन मोरे, अजय मोरे, मनीष मोरे, निखिल मोरे, ग्रा. पं सदस्य सुरेश मोरे, रॉबिन राजपूत, थॉमस राजपूत, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा