Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

शुटींग बॉल चे खेळाडू गाडगे यांचे निधनाने क्रीडा जगतात पोकळी; देशमुख.



सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी (राजे शशिकांत जाधव )दि३०सिंदखेड राजा तालुक्यामधील सवडद येथील मधुकर गाडगे  वर 62 वर्ष हे शुटींग बॉल चे राष्ट्रीय खेळाडू असून यांचे अल्पशा आजाराने दि.३० रोजी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरातील सर्व प्रकारच्या खेळाडू मध्ये पोकळी निर्माण  आहे. असे मत क्रिकेट असोसिएशन संघाचे तालुकाध्यक्ष गजेंद्र देशमुख यांनी व्यक्त केले आहे.                                            

पुढे बोलताना ते म्हणाले की साखरखेेेेर्डा पासून ६ किलोमीटर अंतरावर सवडद हे गाव असून ह्या गावचे रहिवासी आहेत. प्रथम त्यांना हॉलीबॉल खेळण्याची आवड होती.त्यातच त्यांनी स्वामी विवेकानंद शुटींग व्हॉलीबॉल संघ सवडद येथे तयार केला. बरेच वर्ष विदर्भ शुटींग व्हॉलीबॉल संघाचे कर्णधार होते.तसेच अनेक वर्षं शूटिंग हॉलीबॉल मध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीचे उत्कृष्ट खेळाडू म्हणून जिल्ह्यासह महाराष्ट्र भर परिचित होते.                                          
त्यांचा हॉलीबॉल चा गेम बघण्यासाठी बरेच प्रेक्षक आवर्जून उपस्थित राहत होते.                                                      
क्रीडा क्षेत्रातील एक नामवंत खेळाडू तसेच उत्कृष्ट मार्गदर्शक होते. वयाच्या 62 वर्षे अचानक निधन झाल्यामुळे परिसरात व खेळाडू मध्ये  हळहळ व्यक्त होत आहे. मधुकर गाडगे हे जिल्ह्याच्या खेळाडूचे मार्गदर्शक व नामवंत खेळाडू हरवल्याची खंत क्रीडा क्षेत्रात आहेेे.असे असे उद्गगार सिनखेडराजा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र देशमुख यांनी बोलतांना व्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध