Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २ सप्टेंबर, २०२०
जिप माध्यमिक शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करा..!
उस्मानाबाद(राहूल शिंदे) दि.२ जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांचे निवडश्रेणीचे प्रस्ताव मंजूर करून आदेश निर्गमित करावेत याबाबतचे निवेदन उस्मानाबाद जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेद्वारे शिक्षणाधिकारी (प्रा.) रामलिंग काळे यांना देण्यात आले.
सदरील निवेदनात म्हटले आहे की,आपल्या अधिनस्त कार्यरत असलेले अथवा या पूर्वीच सेवानिवृत्त झालेले माध्यमिक शिक्षक ज्यांची अखंडित सेवा २४ वर्षे पूर्ण झालेली आहे अशा पात्र माध्यमिक शिक्षकांना निवडश्रेणी मंजूरीसाठीचे प्रस्ताव पाच-सहा महिन्यापूर्वीच शिक्षण विभागास सादर केलेले आहेत.
परंतू अद्यापही संबंधित शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर होऊन आदेश निर्गमित झाले नसल्याने प्रहार शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी (प्रा.)रामलिंग काळे यांची भेट घेऊन निवडश्रेणी मंजूरी बाबत अगदी सकारात्मक चर्चा केली. निवडश्रेणी मंजूरी प्रस्तावांची पडताळणी झालेली आहे, काही उणीवा त्रुटींची छाननी चालू आहे. लवकरच पुढिल १५-२० दिवसात निवडश्रेणी मंजूर पात्र माध्यमिक शिक्षकांची यादी तयार करून आदेश निर्गमित केले जातील असे संघटनेला आश्वासित केले.
यावेळी प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत,जिल्हा कार्याध्यक्ष विशाल अंधारे,जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन,जिल्हा नेते संतुक कडमपल्ले,उस्मानाबाद तालुका संपर्क प्रमुख धम्मदीप सवई,परंडा तालुकाध्यक्ष विनोद सुरवसे आदि.
पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा