Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०
विश्वमराठासंघ उमरगा तालुका यांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन...!
उमरगा (राहूल शिंदे) दि24. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर विश्व मराठा संघ उमरगा यांच्या वतीने राज्य व केंद्र सरकारचा निषेध करीत,
विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य उमरगा तालुका अध्यक्ष बाबा पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार संजय पवार यांना निवेदन देण्यात आले,
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणतीही शासकीय भरती करू नये,अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी विश्व मराठा संघातील गणेश शिंदे, सागर भोसले , बाळासाहेब माने, शशिकांत भोसले, रंजीत बिराजदार, आदिनाथ पवार, लक्ष्मण मिसाळ, सुरज भोसले, नितीन नागरे, अनिकेत साठे आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा