Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
विद्यार्थ्यांचे हित जपणार...!आ.रोहित पवार औषधी वनस्पती ,मास्क आयुर्वेदिक पुस्तक व खाऊ वाटप कार्यक्रम...!
विद्यार्थ्यांचे हित जपणार...!आ.रोहित पवार औषधी वनस्पती ,मास्क आयुर्वेदिक पुस्तक व खाऊ वाटप कार्यक्रम...!
कर्जत जामखेड चे लोकप्रिय आ. रोहित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल डिस्टन्स ठेवून श्री नागेश विद्यालय मध्ये वाटप करण्यात आले.
जामखेड (राहूल शिंदे)दि. २४ रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये आमदार रोहित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह असलेले वटवृक्ष वृक्षारोपण करून कर्मवीरांच्या प्रतिमा पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली
स्कूल कमिटीच्या वतीने आमदार रोहित दादा पवार यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये प्राचार्य हरिभाऊ ढवळे यांनी पर्यावरण जनजागृती व शालाबाह्य विद्यार्थ्यांसाठी पदवीपर्यंत शिक्षणाची सुवर्णसंधी रोहित दादांच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे याचे माहिती दिली.
त्यानंतर पर्यावरण प्रतिज्ञा व शपथ एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांनी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांचा समवेत दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेश विद्यालयाच्या स्कूल कमिटी अध्यक्ष हरिभाऊ बेलेकर होते. प्रमुख उपस्थिती कन्या विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष मधुकर राळेभात, प्रकाश सदाफुले, नगरपरिषदचे सी.ओ.मिनीनाथ दंडवते ,नायब तहसीलदार लांडगे, गटशिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे ,उद्योजक रमेश आजबे, राजेंद्र गोरे ,प्रजापती ब्रह्मकुमारी शोभाताई, प्राचार्य हरिभाऊ ढवळे, मुख्याध्यापिका सौ.के.डी.चौधरी, प्रा रमेश बोलभट, संतोष ससाणे सर्व शिक्षक ,पत्रकार बंधू, ग्रामस्थ सोशल डिस्टन्स ठेवून उपस्थित होते.
विद्यार्थी ऋषिकेश अशोक बहिर व कु श्रेया पप्पू गाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
मधुकर (आबा)राळेभात यांनी विद्यालयाचे स्थिती व शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी यांची माहिती दिली. हरिभाऊ बेलेकर यांनी विद्यालय व सर्व कमिटीच्या वतीने वाढदिवसाच्या दादांना शुभेच्छा दिल्या.
आ. रोहित पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक वृक्ष, मास्क, खाऊ ,आयुर्वेदिक वृक्ष पुस्तिका वाटप करून महाराजास्व अभियानांतर्गत मिळालेले विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले वाटप करण्यात आले.
आ.रोहित पवार यांनी
मनोगतामध्ये विद्यार्थी व पालकांनी वृक्ष संवर्धन करून आयुर्वेदिक वृक्ष लागवड करावी कोरोणा संसर्ग काळामध्ये मास्क, हॅन्ड सॅनिटायझर चा वापर करावा व आवश्यक ती काळजी घ्यावी. जे विद्यार्थी शालाबाह्य असतील त्यांना सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांची माहिती आमच्याकडे पोहचवा त्यांना शाळेच्या प्रवाहात आणु व त्यांची आर्थिक अडचण दूर करू असे मत व्यक्त केले. कर्जत 35000 वृक्ष व जामखेड 35000 वृक्ष तसेच सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मास्क औषधी वनस्पती व माहिती पुस्तक वाटप केले आहेत .तसेच विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश बोलभट संतोष ससाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सौ के डी चौधरी यांनी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा