Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

तेली समाज युवक आघाडीचे राष्ट्रीय प्रवक्ते विक्रांत चांदवडकर यांची शिरपूरला भेट..!



शिरपूर(प्रतिनिधी)अखिल भारतीय तेली समाज साहू युवक महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा माजी प्रदेशाध्यक्ष कॅप्टन विक्रांत चांदवडकर यांनी शिरपूर येथे तेली समाज युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट देऊन  तेली युवक आघाडीच्या कार्याचे कौतुक केले.

अखिल भारतीय तेली समाज साहू युवक महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष कॅप्टन विक्रांत चांदवडकर हे दोन दिवसाच्या मध्य प्रदेश दौऱ्यावरून परतत असताना त्यांनी शिरपूर येथे सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांचे स्वागत महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांनी केले.

याप्रसंगी शामकांत ईशी यांनी राज्य युवक आघाडीच्या व उत्तर महाराष्ट्रातील युवक आघाडी महासभेच्या कार्याचा आढावा सादर केला राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर ,राष्ट्रीय कोषाध्यक्ष कृष्णराव हिंगणकर,यांच्या नेतृतवाखाली व युवक आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयभाऊ चौधरी, प्रदेशाध्यक्ष सुखदेव वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात व उत्तर महाराष्ट्रात जोरदार काम सुरू असल्याचे सांगून कोरोना महामारीत केलेल्या कामाचा आढावा सादर करून युवक आघाडीने समाजातील कोरोना योध्दांना ऑनलाइन सन्मानपत्र व  पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केल्याचे सांगितले.
 
यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते विक्रांत चांदवडकर यांनी बोलताना सांगितले की, देशात महासभा युवक आघाडीचे कार्य जोमात असून त्यात महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडी चे कार्य देशात क्रमांक एकचे काम असून त्यातही प्रदेश उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी  शामकांत ईशी  यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जोमात काम असून राज्यात नंबर एक काम आहे कोरोना महामारीत त्यांनी समाजासाठी  केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. 

कोरोनात समाजातील डॉक्टर, नर्सेस, शिक्षक, सामाजिक, राजकीय नेते कार्यकर्ते, युवक,शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन  गौरव करून तेली समाज युवक आघाडीने खूप मोठे काम केल्याचे सांगून आघाडीच्या कार्याचा गौरव केला. 

यावेळी प्रांतिक तेली समाज युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी, शिरपूर तेली समाज पंच मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय चौधरी, युवक आघाडीचे अध्यक्ष दुर्गेश चौधरी, दिनेश चौधरी, महेश चौधरी, आशिष चौधरी, प्रकाश महारू चौधरी, खान्देश तेली समाज मंडळाचे तालुकाध्यक्ष दिनेश चौधरी, सचिव राकेश चौधरी, मनोज भगवान चौधरी, प्रकाश सुनील चौधरी, धोंडू चौधरी, आकाश चौधरी, नरेश चौधरी,सुरेन्द्र चौधरी, सुनिल चौधरी, भरत चौधरी,रामकृष्ण चौधरी, संजय दगा चौधरी, हरीश चौधरी,व पदाधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी शामकांत ईशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,आभार अध्यक्ष दुर्गेश चौधरी यांनी मानलेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध