Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार...!नवापूर नगर परिषदेचा दि.20 सप्टेंबर रोजी नवीन आदेश..!
नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार...!नवापूर नगर परिषदेचा दि.20 सप्टेंबर रोजी नवीन आदेश..!
नवापूरमध्ये सार्वजनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्क न लावल्यास भरावा लागेल दंड
कोरोना निर्मूलनाबाबत च्या आदेशाचे पालन व्हावे यादृष्टीने आज दि.20 रोजी नवापूर नगर परिषदेने काढलेल्या आदेशात नवापूर शहरातील सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल न लावल्यास 200 रुपये दंड करण्याचे निर्देश नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी पान किंवा तंबाखूचे सेवन केल्यास 100 रुपये दंड आकारणी करण्यात येईल.
(मेडिकल दुकाने व दवाखाने सोडून) सकाळी 9 ते सायंकाळी 7 या निर्धारीत वेळेव्यतिरिक्त दुकाने सुरू ठेवल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल.
रविवारी जनता कर्फ्यु दरम्यान केवळ दूध आणि वृत्तपत्र विक्रीस सकाळी 7 ते 9 या वेळेत अनुमती असेल. (दिवसभर मेडिकल दुकान व दवाखाने सोडून) इतर दुकाने सुरू राहिल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
दंडाची रक्कम भरण्यास जर कोणी टाळाटाळ केल्यास त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 आणि भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आदेशाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा