Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

बीज प्रक्रियेबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन....!



दळवेल : पारोळा तालुक्यातील दळवेल येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय पुणे आयोजित ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूत आकाश शिवालाल चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी जैविक आणि रासायनिक पद्धतीने बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक आयोजित केले होते. 

आकाश चव्हाण यांनी गाव परिसरातील शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया पद्धत कशी करावी,त्याचे फायदे व परिणाम या बाबत माहिती दिली.बीजप्रक्रिया पद्धतीमुळे पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होतात व पेरणी सुलभ होते तसेच ,बीजवरील रोग नियंत्रण करता येते.बियाण्याची उगवण क्षमता वाढते.बियाण्याचा दर्जा वाढवला जाऊन बाजार भाव चांगला मिळतो.याचबरोबर माती परीक्षण,पशुपालन,पीक उत्पादन तंत्राचा वापर,पिकावरील रोग व किडीचे व्यवस्थापन ,शेतकऱ्यांच्या सेवार्थ  शासनाच्या विविध योजना इ. संबंधी शेतकऱ्यांना माहिती दिली.

यावेळी श्रावण चव्हाण,मनोज चव्हाण, हरलाल चव्हाण,दयाराम जाधव,दिलीप जाधव, मोरसिंग जाधव,आदी शेतकरी उपस्थित होते. शासकीय कृषि महाविद्यालयाच्या कृषिदूताने राबविलेल्या कार्यक्रमाचे कौतुक परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केले.

कार्यक्रमासाठी पुणे येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस.डी. मासाळकर,कार्यक्रम समन्वय डॉ. व्ही.जे.तरडे,कार्यक्रम चेअरमन डॉ.एम.एन. वाघमारे,कार्यक्रम अधिकारी डॉ.जे.एस.कुंभार ,सर्व विशेषज्ञ यांचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध