Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०
शिरपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा...!
दि.२० सप्टेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी,
आ.काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन
शिरपूर - शिरपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, दि.२० सप्टेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
संपूर्ण तालुक्यात रविवारी दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी वादळी वारा व अवकाळी पावसाने झोडपले. यात सर्वच ठिकाणी शेती पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून काही भागात वृक्ष देखील उन्मळून पडले.तालुक्यात शेती पिकांचे फार मोठ्या प्रमाणात कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील ऊस, कापूस, पपई, सोयाबीन, केळी, ज्वारी, बाजरी, मका व इतर अनेक खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे असे आमदार काशिराम पावरा यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करतांना सांगितले.शिरपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व या सर्व पिकांचे पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर सहकार्य करावे असे निवेदन जिल्हाधिकारी संजय यादव यांना देण्यात आले.
यावेळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष के. डी. पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, बाजार समितीचे संचालक अविनाश पाटील, भाजपा शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, माजी जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, पिळोदा उपसरपंच योगेश बोरसे, माजी पंचायत समिती सदस्य भरत पाटील, वाघाडी माजी सरपंच ऍड. प्रतापराव पाटील, खर्दे पाथर्डे सरपंच सुनिल पाटील, जगन्नाथ पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष विक्की चौधरी, जितू सूर्यवंशी, मंगेश पाटील यांनी निवेदन दिले.
तसेच यापूर्वी शिरपूर तालुक्यात डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० मध्ये झालेल्या नुकसानीची तसेच ऑगस्ट २०२० मध्ये अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी भाजप च्या वतीने जिल्हाधिकारी संजय यादव यांना आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दि. १० सप्टेंबर रोजी देखील निवेदन देण्यात आले होते. त्याबाबत देखील अंमलबजावणी व्हावी असे सांगण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी पाठपुरावा करून शेतकरी बांधव यांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा