Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
जामनेर लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूलचा अजब कारभार..!फी वेळेवर न भरल्यामुळे विद्यार्थ्यास ऑनलाइन शिक्षणातून वगळले जाते. पालकांची गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार...!
जामनेर लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूलचा अजब कारभार..!फी वेळेवर न भरल्यामुळे विद्यार्थ्यास ऑनलाइन शिक्षणातून वगळले जाते. पालकांची गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार...!
जामनेर प्रतिनिधी.जामनेर शहरातील लोर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वेळेवर फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यास ऑनलाईन शिक्षणातून वगळले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळेपालकांनी मा.गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जामनेर यांच्याकडे केली तक्रार. सदर शाळेला पालकांच्या वतीने दिनांक ०८/०७/ २०२० रोजी एक निवेदन देण्यात आले होते
या निवेदनाला आश्वासन म्हणून शाळेतील अध्यक्ष व प्राचार्य यांनी मान्य करताना असे सांगितले होते की या वर्षाचे शैक्षणिक शुल्क आम्ही शिक्षक पालक संघाचे कार्यकारी समिती यांच्याशी चर्चा केल्यानंतर ठरवू व कोरना महामारीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा प्रत्यक्ष शाळा सुरू होईल तेव्हा फी ठरवून ती स्वीकारली जाईल व फी वेळेवर न भरल्यामुळे कोणत्याही पाल्याचा ऑनलाइन शिक्षणातून वगळले जाणार नाही.तसेच मागील वर्षाच्या बस भाड्यातील एक महिन्याची बस भाडे प्रत्येक पालकास परत केले जाईल व शिक्षक पालक कार्यकारी समिती शाळा प्रत्यक्ष चालू झाल्यावर गठित केली जाईल असे आश्वासन दिले होते.
त्यामुळे सर्व पालकांनी अध्यक्ष व प्राचार्य यांच्यावर विश्वास ठेवून पुढील कोणतीही कायदेशीर पावले उचलली नाही. परंतु अध्यक्ष व प्राचार्य यांनी दिलेले कोणतेही आश्वासनाची पूर्तता न करता उलट प्रत्येक पाल्याचे केवळ फी भरण्याच्या कारणावरून कोणतेही सबळ व संयुक्तिक कायदेशीर कारण व तांत्रिक अडचण नसताना एकतर्फी निर्णय घेऊन ऑनलाइन शिक्षणातुन वगळून हेतू पुरस्कर वंचित ठेवून शैक्षणिक नुकसान केले आहे.
कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही पाल्यास फी न भरण्याच्या कारणावरून ऑनलाईन शिक्षणातून वगळण्याचे तसेच पाल्यांना शैक्षणिक शुल्क सक्तीने वसुली न करण्याचे शासनाचे तसेच उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असताना देखील शाळा व्यवस्थापनाने बर्याच पाल्यांना ऑनलाईन शिक्षणातून
वगळले तसेच शाळेने शिक्षक व पालक संघाची कार्यकारी समिती गठीत केलेली नसून शैक्षणिक शुल्काच्या कोणत्याही रकमेस कायदेशीर रित्या रितसर मान्यता घेतली नाही. या कारणावरून शाळेत सक्तीचे शैक्षणिक शुल्क वसूल करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार प्राप्त होत नाही.
असाही आरोप पालकांनी केला.तसेच शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी तसेच बस चालक अरेरावी करीत उद्धटपणाने पालकांशी वागत असतात. शाळे मार्फत या वर्षाचे शैक्षणिक शुल्क भरण्याबाबत मोबाईलवर वारंवार धमकीवजा संदेश पाठवून तगादा लावला जातो. शाळेची चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
व या वर्षाचे शैक्षणिक शुल्क पाल्याने वेळेवर न भरल्यामुळे ऑनलाइन शिक्षणातून वगळलेल्या पाल्यांना त्वरित ऑनलाइन शिक्षणात सहभागी करून घ्यावे आणि या वर्षाचे शैक्षणिक शुल्क वसूल करण्यासाठी सक्ती करू नये अशी तक्रार पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. निवेदन देते वेळी ,अडव्होकेट राजू मोगरे ,भगवान पाटील ,डॉ. योगेश इंगळे, रतन परदेशी ,योगेश मानकर ,शेखर महाजन ,चंदनशिव राजपूत व इतर पालक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा