Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
नवापूर मध्ये ' माझे कुटुंब, माझी जबाबदारी ' मोहिमे अंतर्गत आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या घरापासून सर्वेक्षणाचा प्रारंभ...!
नवापूर मध्ये ' माझे कुटुंब, माझी जबाबदारी ' मोहिमे अंतर्गत आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या घरापासून सर्वेक्षणाचा प्रारंभ...!
' कोरोना ' जनजागृतीसाठी आणि आरोग्य सर्वेक्षणासाठी शासनाने ' माझे कुटुंब , माझी जबाबदारी ' मोहिम हाती घेतली असून,या मोहिमेंतर्गत आरोग्य सर्वेक्षणास नवापूरमध्ये आमदार नाईक यांच्या हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करून आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या घरापासून सर्वेक्षणाचा प्रारंभ करण्यात आला.
आजपासून अडीच हजारांवर आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन १ ९ लाख नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेणार आहेत. २५ ऑक्टोबरपर्यंत सर्वेक्षण होणार आहे.
सर्व नागरिकांनी आरोग्य पथकाला सहकार्य करावे व मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री.नाईक यांनी यावेळी केले. यावेळी नगराध्यक्षा हेमलता पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तृप्ती धोडमिसे, तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत वसावे आदी उपस्थित होते. आमदार नाईक यांनी आदिवासी भाषेतून नागरिकांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा