Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

विविध मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेचे एसडीओ यांना निवेदन...!



खामगाव प्रतिनिधी:शेतकरी, शेतमजूर, कंत्राटी कर्मचारी, कामगार,किरकोळ व्यापारी, आदिवासी महिला व विविध विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांनबाबत आज अखिल भारतीय किसान सभेकडून प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

शेतकरी, शेतमजूर, कंत्राटी कर्मचारी, कामगार, किरकोळ व्यापारी, आदिवासी महिला व विविध विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांनी गंभीर रूप धारण केले आहे.

देशातील ही बहुसंख्य जनता सरकार दरबारी आपला असंतोष प्रकट करते आहे. त्यावेळी धर्मभावना आणि राष्ट्रवादाची अफू पाजत जनतेला संभ्रमित करण्याचं काम भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून करीत आहे. बहुसंख्य अशा श्रमिक वर्गाला बेदखल करीत भांडवलदारांना पूरक धोरणे हे सरकार राबवित असून वर्णव्यवस्था निर्माणाचे कार्य अत्यंत गतिमान झाले आहे हे सरकारच्या आजवरच्या कार्यकाळ यावरून हे स्पष्ट दिसत आहे.सरकारचे ह्या भूमिकेचा लालबावटा संयुक्त कृती समितीच्या वतीने तीव्र निषेध केला. सिंचनाची दुरवस्था शेती संसाधनाची भाववाढ आणि शेतमालाच्या भावाची असुरक्षितता यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध