Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ६ सप्टेंबर, २०२०
शिंदखेडा तालुक्यातील रामी गावात कोरोना चा शिरकाव...!
रामी ग्रा.पं गावात जंतूनाशक फवारणी व वेळोवेळी लक्ष देत आहे
दोंडाईचा प्रतिनिधी:- दिग्विजयसिंग राजपुत
(मो.9860679223) शिंदखेडा
तालुक्यातील रामी गावात कोरोना चा शिरकाव झाला आहे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावात चांगलीच धावपळ उडाली ग्रामंस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे कोरोना मुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे कोणीही घराबाहेर पडू नये अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर निघा असे आवाहन प्रशासनाने केले आहे कोरोना केअर सेंटरचे प्रमुख डॉ.हितेंद्र देशमुख कोरोना मुळे रात्र दिवस एक करून खुप मेहनत घेत आहेत.
निमगूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने व रामी ग्रा.पं प्रशासन रामी येथील ग्रामस्थांचे आरोग्य तपासणीसह सर्वेक्षणास सुरू केली रामी ग्रामपंचायतीने गावात जंतुनाशक फवारणी केली यासाठी रामी चे सरपंच कड्ड भिल रामी चे उपसरपंच युवानेते कुलदिपसिंह गिरासे, ग्रा.पं सदस्य श्री.सुरेश माळी श्री,किशोर रामराजे (तंटामुक्ती अध्यक्ष) श्री सत्तर भिल (सदस्य) श्री.अजय कोळी(सदस्य) श्रीमती. सरलाबाई गिरासे (सदस्य) श्रीमती. संगीताबाई गिरासे (सदस्य) श्रीमती.सुनंदाबाई चौधरी (सदस्य) श्रीमती.चित्राबाई माळी (सदस्य) श्रीमती. सुंदराबाई भिल (सदस्य) श्रीमती.छायाबाई भिल (सदस्य) ग्रामविकास अधिकारी श्री आर.बी.निकुंभे, पोलीस पाटील श्रीकांत वाघ, श्रीमती मनिषाबाई गिरासे (लिपिक) श्री.ईश्वर माळी (शिपाई) श्री.विजयसिंग गिरासे (पाणिपुरवठा कर्मचारी) श्री.देवनाथ रामराजे (ग्रामीण रोजगार सेवक) विकास चौधरी(सामाजिक कार्यकर्ते) आदी खुप परिश्रम घेत आहेत व ग्रा.पं प्रशासन लक्ष देऊन असल्याचे सांगितले
ग्रामसेवक आर.बी.निकुंभे, सरपंच कड्ड भिल, ग्रा.पं.सदस्य विकास राजपुत तसेच सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रा.पं.कर्मचारी आदिं परिश्रम घेत आहेत.
आपल्या स्वताचे आरोग्याची काळजी घ्यावी अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये ग्रामपंचायत प्रशासन लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. प्रशासनाला सहकार्य करावे प्रशासन रात्री दिवस स्वत:चा जीव धोक्यात टाकून आपल्या साठी लढा देत आहेत घाबरू नका सतर्क रहा कोरोना सोबत आपल्याला हरायचे नाही लढायचे आहे आपण करूया कोरोना मुक्त रामी
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा