Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

विश्व मराठा संघाची हिप्परगा राव येथील शाखा कार्यकरणी जाहीर ! ! !



उमरगा (राहूल शिंदे) दि.27 तालुक्यातील हिप्परगा राव येथे ''विश्व मराठा संघ'' शाखा स्थापना करण्यात आली.मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे सर्व मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्यासाठी गावोगावी बैठका घेऊन पुढील दिशा ठरवली जात आहे.
सलेगावे मनोज गजानन यांची हिप्परगा राव शाखा प्रमुख पदी नियुक्ति झाली. तर मुळे कृष्णा धनराज हिप्परगा राव ता.उमरगा यांची उपशाखा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली व भोसले बजरंग बालाजी शाखा (सचिव) पदी नियुकी विश्व मराठा संघटनेचे युवक तालुकाध्यक्ष मा.बाबा पवार यांच्या हस्ते दि. 26 रोजी नियुक्ति पत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी बाळासाहेब माने,सागर भोसले, रंजीत बिराजदार ,सूरज भोसले , योगेश ढगे,किरण जगताप, सुदर्शन कदम बळीराम शिंदे पवन जेवळे राहुल जावळे प्रतीक जेवळे आकाश बनसोडे जितेंद्र लिंबारे वैभव गायकवाड प्रदीप शिरोळे ,कृष्णा भोसले,विनोद मुळे, तानाजी भोसले,ऋषिकेश भोसले, बाप्पा भोसले, प्रीतम नागदे, सुभाष मुळे,प्रमोद मुळे, रवी पाटील,प्रवीण भोसले, अनिकेत मुळे, अक्षय भोसले, आनंद पाटील,आकाश भोसले, सुर्या भोसले,हरी मुळे,आदि उपस्थित होते.

सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.आहेत अशी माहिती बाबा पवार यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध