Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०
कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा उद्या उस्मानाबाद जिल्हा दौरा
उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.26 राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे हे दि. 27 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा तपशील पुढील प्रमाणे आहे.
रविवार, दि. 27 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 3:30 वाजता लातूर येथून शासकीय मोटारीने तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद कडे प्रयाण.
सायंकाळी 5:30 वाजता तुळजापूर येथे आगमन व पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा व कृषी विषयक योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक.
सायंकाळी 6:30 वाजता तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथून शासकीय मोटारीने सोलापूरकडे प्रयाण.
पावसामुळे जिल्ह्यात ठीकठिकाणी मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.सोयाबीन,उडीद,मूग,ऊस पिकांचे नुकसान जास्त आहे.
कृषी मंत्री पाहणी करून कोणता निर्णय घेतात? काय घोषणा करतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा