Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, खरीप पीक विमा2020 मंजूर ! ! !
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.14 राज्यातील शेतकऱ्यासाठी आनंदची बातमी , खरीप हंगाम सन 2020 मधील पिक विमा मंजूर झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्याच्या बँक खात्यावर लवकरच काही अंशी रक्कम जमा होणार आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2020 राज्यात 29/6/2020व 17/7/2020 च्या शासन निर्णयाने भारतीय कृषी विमा कंपनी,इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लि., रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि., भारती अँक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लि, बजाज आलियानस इन्शुरन्स कंपनी लि.,एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी लि.या सहा कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्ता राज्य शासन हिस्सा एकूण 80%रक्कमेच्या 50%रक्कम म्हणजेच 496.14कोटी इतकी रक्कम पिक विमा हप्ता अनुदानापोटी वितरीत करण्यात शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
राज्यशासनाचा 50%हिस्सा 496.14 कोटी + केंद्र शासनाचा 50% हिस्सा 496.14 कोटी व विमा कंपनीचा हिस्सा 20% 248.07कोटी एकूण 100%रक्कम 1240.35कोटी रूपये रक्कम राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याचा अंदाज आहे.
कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे.यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी का होईना दिलासा मिळणार आहे.
या मिळणाऱ्या रक्कमेकडे शेतकरी लक्ष लावून आहे, यामुळे येणारी दिवाळी काही प्रमाणात गोड होईल.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा