Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०
भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा मागणीला यश..!
धुळे जिल्ह्यात मका खरेदी व नोंदणी केंद्र दि.१ नोव्हें पासुन सुरु होणार
मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांचाकडे केली होती मागणी
शिरपूर : संपुर्ण धुळे जिल्ह्यत मोठ्या प्रमाणात मका या पिकाचे उत्पादन घेण्यात येते सध्या मका हमीभाव खरेदी केंद्र सुरु नसल्याने जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा, साक्री या चारही तालुक्यातील मका उत्पादक शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तातडीने मका हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी (दि.५ आॅक्टो) रोजी राज्य शासनासह जिल्हाधिकारी संजय यादव धुळे यांचाकडे केली होती. त्यानुसार शासन व प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेवुन धुळे जिल्ह्यात मका (भरडधान्य) खरेदी केंद्र दि. १ नोव्हेंबर पासुन सुरु करण्यात येत आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा या मागणीला यश आले असुन यामुळे शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, महा. विधान सभा विरोधीपक्ष नेते ना. देवेंद्र फडणवीस,कृषीमंत्री ना. दादाजी भुसे, पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार, जिल्हा मार्केटिंग अधिकारी धुळे यांना हि पाठविल्या होत्या.
त्यानुसार या मागणीची तातडीने दखल घेण्यात आली असुन जिल्ह्यात जिल्हा पणन अधिकारी धुळे यांच्या मार्फत (४) चार व महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नासिक प्रादेशिक कार्यालय नंदुरबार यांचे मार्फत (१) एक असे एकुण (५) पाच मका (भरडधान्य) खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी दि.१४ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांना आदेश प्राप्त झालेला असुन शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे जिल्ह्यात एकुण (५) पाच मका खरेदी केंद्र प्रक्रिया दि.१ नोव्हेंबर पासुन सुरु करण्यात येत असल्याचे भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांना धुळे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी पत्राव्दारे कळविले आहे जिल्ह्यात मका खरेदी केंद्र सुरु होत असल्याने यामुळे मागणीला यश आले असुन शेतकरी सर्वत्र समाधान व्यक्त करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा