Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
सामाजिक संस्थांची मदत घेऊन गोर गरीबांना परवडेल असे जागतिक दर्जाचे ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल व नर्सिंग कॉलेज चा राज्यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ....!
सामाजिक संस्थांची मदत घेऊन गोर गरीबांना परवडेल असे जागतिक दर्जाचे ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल व नर्सिंग कॉलेज चा राज्यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ....!
जामनेर ,प्रतिनिधी:जामनेरात ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल व नर्सिंग कॉलेजचा आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.तसेच जी.एम.डायग्नॉसिस सेंटरचे ही त्यांनी व्हर्च्युअल उदघाटन केले.
या शुभारंभ प्रसंगी माजी मंत्री गिरीश महाजन,खा.उन्मेश पाटील,खा.सुभाष भामरे, खा. रक्षाताई खडसे आणि अन्य नेते उपस्थित होते. आ.गिरीश महाजन यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये हॉस्पिटल साठी ज्या सामाजिक संस्थांनी मदत केली त्या सर्वांचे आभार मानले व हॉस्पिटल मधील सर्व सोयी सुविधा संदर्भात माहिती दिली. आरोग्य दूत रामेश्वर नाईक,अरविंद देशमुख व जी.एम ची संपूर्ण टीम ने या हॉस्पिटल साठी खूप मेहनत घेतली.
असे आ.गिरीश महाजन म्हणाले.तसेच विरोधी पक्ष नेते मा.ना.श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की सामाजिक संस्थांची मदत घेऊन गोरगरिबांना परवडेल असे जागतिक दर्जाचे हॉस्पिटल आता जामनेर मध्येच सुरू झाले आहे. रुग्णांना कमी दरात रूग्णसेवा मिळावी, याचा प्रयत्न येथे आवर्जून करण्यात आला असून त्यामुळे सर्वांसाठी हक्काचे एक रूग्णालय उपलब्ध झाले आहे.याठिकाणी अतिशय कमी वेळात कोरोना वॉर्ड तयार झाल्या मुळे मोठे वरदान ठरले असून ते अभिनंदनीय आहे.जगातील बेस्ट अशा मशनरी येथे उपलब्ध असून टाटा ,रिलायन्स सारख्या हॉस्पिटल शी हे हॉस्पिटल टायप आहे.त्या मुळे आपल्याला पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाण्याची गरज नाही.आज 15 लाखांवर रूग्ण आणि 40 हजारावर मृत्यू. ही स्थिती भयावह आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे गरजेचे आहे. अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
आपल्या सरकारच्या काळात आरोग्य शिबिरांतून अनेक रुग्णांना लाभ देण्याचे काम केले आहे आणि असेच काम यापुढेही गिरीश महाजन यांच्याहस्ते होत रहावे, आणि तुमच्या स्वप्नातील मोठे हॉस्पिटल लवकर उभे राहावे अश्या मी त्यांना शुभेच्छा देतो. असेही आवर्जून ना.देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या हॉस्पिटल शुभारंभ कार्यक्रमासाठी आरोग्य दूत रामेश्वर नाईक ,अरविंद देशमुख भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर जामनेर ता. ए. सो.सचिव जितेंद्र पाटील, श्रीराम महाजन, नवलसिंग राजपूत,रवींद्र झाल्टे, आनंदा लव्हारे,अनिस शेख ,दीपक पाटील, नितीन झाल्टे,संतोष बारी, दीपक तायडे, चेतन चौधरी, आतिश झाल्टे, कैलास पालवे, सुभाष पवार, राहुल पाटील,सर्व जी. एम टीम आणि सर्व नगरसेवक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा