Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०
रोहिणि प्राथमिक आरोग्य केंद्रात..! जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा..!
गेल्या मार्च महिन्यापासून ते आजपर्यंत आरोग्य श्रेत्रातिल सर्व कर्मचारीवर्ग कोव्हिड 19 आजाराचा प्रादुर्भाव कमिकरण्या करिता प्राणपणाने आरोग्य सेवेचे कर्तव्य बजावत आहेत.
गेल्या आठ महिन्यांपासून कौटुंबिक अडचणी बाजुला सारून एक दिवसाची ही रजा न टाकता,न थकता सलग कार्यतत्पर आहेत.
कोरोनाच्या भितीदायक वातावरणात कामाच्या अतिश्रमामुळे काहीवेळेस मनाची घालमेल होते,चिडचिड वाढते.त्याचा दुष्परिणाम स्वतःच्याच कुटुंबावर व कामावर होतो.हा तणाव वेळीच दुर झाला नाही तर आपण नैराश्याच्या गर्तेत अडकत जातो.
याच अनुषंगाने जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र रोहिणि येथे आज तणावमुक्त होवुन मनाचे सबळिकरण कसे करावे व आहे त्या कामात आनंद कसा मिळवावा या करिता प्रा.डाॅ.डोंगरे एन एस (मानसशास्त्र विभाग प्रमुख एसपिडिएम कॉलेज शिरपूर )यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
धन्वंतरी प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन डाॅ.नागोराव डोंगरे सर व डाॅ.राष्ट्रपाल अहिरे व डाॅ.सोलंकी यांनी केले
केंद्रातील कोरोनामुक्त झालेल्या श्रीमती शिंदे सिस्टर व श्रीमती पाठक सिस्टर या कोरोना योद्धांचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
मानसिक मनोबल कसे वाढवावे.व कामाचा ताण कसा घालवावा यावर अतिशय चांगले मार्गदर्शन झाले अशा भावना कर्मचारीवर्गाने व्यक्त केल्या.
सदर कार्यक्रम आरोग्यदुतांनिच स्वखर्चाने आयोजित केला हे विशेष.
आजच्या कार्यक्रमाचे स्वागताचा पुष्पगुच्छ सह खर्च श्री.देशपांडे नाना (औषधनिर्माण अधिकारी) मंडपाचा खर्च अनिल बंजारा (वाहनचालक)व सर्वाचा जेवणाचा खर्च श्रीमती नाईक सिस्टर (दहिवद) यांनी केला.
नाविण्यपुर्ण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्रात या पुढेही राबविले जातील असे डाॅ.राष्ट्रपाल अहिरे यांनी कार्यक्रमाची सांगता करतांना अधोरेखित केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा