Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यात बनावट नोटांची निर्मिती करणारी टोळी...!स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात..!
शिरपूर तालुक्यात बनावट नोटांची निर्मिती करणारी टोळी...!स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात..!
शिरपूर:प्रतिनिधी: शिरपूर तालुक्यातील कळमसरे या गावी येथे पोलीसांनी बनावट नोटांची निर्मिती उघडकीस आणली आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून इतर दोघांचा शोध सुरु आहे.
बनावट चलनी नोटा आणि यंत्रसामग्री असा ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शिरपूर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने कळमसरे या गावी छापा टाकून बनावट नोटांची निर्मीती उघडकीस आणली. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शिवाजी बुधवंत यांना मिळालेल्या माहितीनुसार कळमसरे या गावी संतोष गुलाब बेलदार याच्या घरात बनावट नोटांची निर्मिती सुरु होती.
या ठिकाणी छापा टाकत असतांना संशयित त्यांच्या ताब्यातील बनावट नोटा जाळतांना आढळून आले. हुबेहुब दिसणाऱ्या दोनशे रुपयांच्या पाच चलनी नोटा, नोटा तयार करण्यासाठी वापरलेले संगणक, प्रिंटर, कागद, कटर, कैची, काटकोन, स्केल पट्टी, हिरव्या व सिल्वर रंगाचे टेप असा एकुण ४८ हजार ३६० रुपये किंमतीचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.
संतोष गुलाब बेलदार व गुलाब बाबु बेलदार या दोघांना पोलीसांनी अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरु आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा