Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर नगरपालिका समोर कचरा फेको आंदोलन...!



जामनेर प्रतिनिधी: जामनेर शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा गोळा करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज नगरपालिका कार्यालयासमोर आणून फेकला. डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पालिकेने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच सात दिवसात कचऱ्याची विल्हेवाट  नाही झाली तर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सुध्धा देण्यात आला.

पालिकेकडून कचरा तसेच गटारी स्वच्छ केल्या जात नाही, त्यामुळे डासांची संख्या वाढत आहे. पालिके मार्फत फवारणी करण्याची मागणी सुद्धा होत आहे.शहरातील लोकांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांना नागरिकांच्या आरोग्याचा विसर पडलेला आहे. 

सर्वच वार्डांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेली नगरपालिका हीच का, असा प्रश्न निर्माण होत आहे.यावेळी शहराध्यक्ष पप्पू पाटील, माजी नगरसेवक माधव चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील,संदीप हिवाळे, सागर पाटील, अनीस पठाण, कृष्णा माळी, मोहन चौधरी,जुबेर शेख,, प्रभू झाल्टे, विशाल पाटील, भूषण पांढरे सह कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध