Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०
सिना कोळेगाव धरणातील पाणी सोडण्याचे आदेश, नागरिकांना सतर्कतेचा इशारा!!!
परंडा (राहूल शिंदे) दि.12 सिना-कोळेगाव प्रकल्प पाणीसाठा अंतिम टप्प्यात असून(90% पेक्षा जास्त) परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आला आहे. परंडा तालुक्यातील सर्वात मोठा हा प्रकल्प आहे.धरणांमध्ये सध्या 4000 क्युसेकस दराने पाण्याची आवक सुरू आहे. आज रात्री 9नंतर धरणातील पाणी नदीत सोडण्यात येईल.
तालुक्यातील खासापुरी,चांदणी, पांढरेवाडी हे मध्यम प्रकल्प तुडुंब भरले आहेत. तुडुंब भरलेल्या खंडेश्वरवाडी प्रकल्प भरावाला तडा गेल्याने धोका टाळण्यासाठी सांडवा फोडुन पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.तर साकत मध्यम प्रकल्पात अध्यापही मुबलक पाणीसाठा नाही. तसेच आनाळा साठवण तलाव ही पाण्यासाठी व्याकुळ आहे. सिनाकोळेगाव धरणाचे पाणी उपसा सिंचनद्वारे सोडण्याची मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहे परतीचा जोरदार पाऊस झाल्याने प्रकल्पाला मिळणारे सीना नदी चे पात्र भरपूर वाहत असल्याने पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. संततधार पाऊस सुरू आहे.
परंडा तालुक्यातील प्रकल्प पाणीसाठाची क्षमता..
सिना कोळेगाव प्रकल्पाची क्षमता 150.49 दलघमीटर साडेपाच टीएमसी आहे.
निम्न खैरी पांढरेवाडी प्रकल्पाची 10.56 दलघमीटर क्षमता आहे.
साकत प्रकल्प 13.590 दलघमीटर क्षमता.
चांदणी प्रकल्प 23.780 दलघमिटर.
तर खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्पाची 10.800 दलघमिटर क्षमता आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा