Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

धडपडणाऱ्या मुलांच्या मागे उभा बाप माणूस- मुलांना बनविले, एक यशस्वी उद्योजक ! ! !


पांढरेवाडी येथील यशस्वी उद्योजक लोहार बंधू यांच्यासोबत अमृता शिंदे यांची यशस्वी व्यवसाया बद्दल चर्चा.

परंडा (राहूल शिंदे) दि.13 तालुक्यातील पांढरेवाडी येथील अशोक बबन लोहार व प्रशांत बबन लोहार या तरुणांची व्यवसाय करण्याची धडपड …आपली  मुले  काहीतरी करू इच्छित आहेत. त्यांना सहकार्य करून सरकारी नोकरीच्या मागे न लगता,त्यांना पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभे करुन त्यांना त्यांच्या  मेहनतीने अन प्रमाणिकपणाच्या जोरावर मिळलेल्या पारंपारिक लोहारकामाच्या शिक्षणातून व वाढत्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी साधलेले समायोजन यामुळे आज चांगला लोखंडी अवजारे बनवणारे कारागीर म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द आहेत. 

अशोक व प्रशांत आणि त्याच्या वडिलांची ही प्रेरणादायी कहानी.
लोहार कुटुंबीयांचा इथपर्यंतचा  प्रवास आणि त्यासाठी त्यांनी केलेली चिकाटी हे अत्यंत उल्लेखनीय अन दखल घेण्यासारखी बाब आहे .

कृषी महाविद्यालय पुणे येथील अमृता शिंदे यांच्याशी बोलताना अशोक  म्हणाले की, प्रथम माझे वडील शेती कामांसाठी लागणारी छोटी-छोटी अवजारे बनवत असतं. या सर्व प्रवासात महत्त्वाचा भाग म्हणजे माझे व्यवसायीक गुरू माझे वडील बबन लोहार यांचा कारण त्यांनी आम्हा भावंडांना व्यवसाय कसा करावा.प्रामाणिकपणे काम केल्यावर कसे पुढे जाता येईल याचे मार्गदर्शन घालून दिलेली शिस्त, हे महत्त्वाचे त्यांनी आम्हाला चांगले  शिकविले , घडवले आमच्यावर  विश्वास दाखवला व माझ्यातील गुण ओळखून मला एक खूप मोठीं संधी दिलीं.मी जो आहे तो केवळ त्यांनी दिलेल्या दृष्टीकोनामुळे व्यवसायातील चिकाटी , सातत्य अन नफा तोटा यावर कधीही गोंधळ न करता आपल्या मेहनतीने व योग्य रीतीने ग्राहकांना सर्व्हिस दिली त्यांच्या कलाने व्यवसाय केला की यश येते हे त्यांनी शिकविले व आत्मविश्वास दिला.

वडिलांनी पाठीमागे आधार दिलाच व मी करत असलेल्या व्यवसायाला मदत व वेळही दिला व ते देत आहेत असे ही ते म्हणाले.

आज ते लोखंडी सारायंत्र, पेरणी यंत्र, नांगर,सरी यंत्र, बैल गाडी, ट्रॅक्टर ट्रॉली बनवून विक्री करतात त्यांच्या कामाची व आकर्षक कलाकृती पाहून बनवलेल्या वस्तूंना मोठ्याप्रमाणात मागणी होत आहे.व त्यांचा व्यवसाय खूप बहरत आहे आणि आर्थिक फायदा होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध