Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

उमरगा येथे ''विश्व मराठा संघाच्या'' वतीने रक्तदान शिबिर संपन्न...!



उमरगा (राहूल शिंदे ) दि.5 देशात व राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.रक्ताची गरज देखील मोठ्या प्रमाणात लागत आहे त्या पार्श्वभूमीवर''विश्व मराठा संघाच्या वतीने श्री.क्षेत्र अचलबेट येथे ,  सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान शिबीर घेण्यात आले.सकाळी तालुक्याचे तहसीलदार संजय पवार यांनी प्रथम रक्तदान करून शिबिरास प्रारंभ झाला. या रक्तदान शिबिरात 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते.
  
त्याला प्रतिसाद देत,''विश्व मराठा संघाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.प्रदेशाध्यक्ष प्रशांत भोसले यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात,गर्दी टाळत रक्तदान शिबीर घेण्यात आले.

श्री कृष्ण रक्तपेढि उमरगा  यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदात्यांचे अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्त घेतले गेले आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगबाबतही विशेष काळजी घेण्यात आली होती. दोन रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते.महिलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता. शिवाय, स्वच्छतेची विशेष खबरदारी म्हणून वारंवार सिनेटाईझरचा वापर करण्यात येत होता.सोशल डिश्टनशिंगचे पालन व आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे तालुका अध्यक्ष बाबा पवार यांनी बोलताना सांगितले.

राज्यात दररोज साधारण पाच ते सात हजार रूग्णांना विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरज असते. कोरोनामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. शिवाय,उन्हाळी सुट्टीतील अनेक मोठे रक्तदान शिबिर कोरोनामुळे आयोजितच केले गेले नाहीत. त्यामुळे राज्यात अवघ्या काही दिवसांचाच रक्त साठा शिल्लक असल्याची माहिती स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. शिवाय, छोट्या स्तरावर रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे आवाहनही केले होते.

कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांनी मदत केली. प्रशासनही तितक्याच गतीने जनजागृती, उपाययोजनांसाठी पुढे होते. कठीण काळात अनेकांना जीवदान मिळण्यासाठी रक्त महत्त्वाचे ठरते. विश्व मराठा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तुटवडा लक्षात घेऊन तातडीने शिबीर घेऊन रक्तदानासाठी पुढे आले. त्यांचे कौतुक करायला हवे. तरूणांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदानाची चळवळ वाढवली पाहिजे.
- संजय पवार, तहसीलदार
 
सर्व रक्तदाते सोशल डिश्टनसिंगचे पालन करून उपस्थितीत होते. सोशल डिस्टंसिंग सह अन्य उपाययोनांचेही विश्व मराठा  संघाच्या कार्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

यावेळी हरी गुरुजी, डॉ.पतंगे, विश्व मराठा संघ तालुकाध्यक्ष बाबा पवार , सागर भोसले, बाळासाहेब माने, रणजीत बिराजदार, विकास जाधव ,सुरज भोसले, शशिकांत भोसले, अभिषेक वडदरे, आकाश भोसले, मनोज सालेगाव, प्रीतम नागदे, कृष्णा मुळे, हरी मुळे, लिंबराज जमादार, अनिल गायकवाड, अभिजीत शिंदे, विनोद मुळे, बजरंग भोसले, सूर्या भोसले, अजित पाटील, चव्हाण शिवाजी, शुभम सानप, स्वप्निल मानेकरण आष्टगे, रघुनाथ गायकवाड, रणजीत पाटील इत्यादी पदाधिकार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध