Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०
मराठा आरक्षणाची,पुढील दिशा ठरवण्यासाठी उस्मानाबादला 'सिंहावलोकन' बैठक ! ! !
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.6 शहरातील समर्थ मंगलकार्यालय येथे मराठा आरक्षणाची पुढील दिशा व मार्ग ठरवण्यासाठी सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीने सिंहावलोकन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
विषय : - 'एक दिशा एक भाषा, एक धोरण' तेच 'तोरण मराठ्यांचा "एकसूत्री" कार्यक्रम राज्याची "सिंहावलोकन" बैठक.
मराठा आरक्षण ही जबाबदारी खऱ्या अर्थाने केंद्र आणि राज्यसरकरची आहे परंतु राजकीय स्वार्थासाठी एकमेकांवर खापर फोडण्याच कट कारस्थान काही महान लोक करत आहेत आणि मराठा क्रांती पर्वाच्या माध्यमातून काही राजकीय दलाल घुसखोरी करून क्रांती पर्वाला त्यांना पाहिजे तशी दिशा देण्याचं काम करत आहेत आणि म्हणूनच हे कटकारस्थान हाणून पाडण्यासाठी एक दिशा एक भाषा, एक धोरण' तेच 'तोरण मराठ्यांचा "एकसूत्री" कार्यक्रम राज्याची "सिंहावलोकन" बैठक दि.7 ऑक्टो रोजी दुपारी 12 वा आयोजीत केलेली आहे.
प्रमुख मार्गदर्शक :- माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील, अॅड. राजेश टेकाळे,अॅड.आशिष गायकवाड, अॅड.रमेश दुबे पाटील तसेच मुंबई हायकोर्ट मध्ये मराठा आरक्षणाच्या केस मध्ये मराठा समाजाच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांची टिम, सुप्रीम कोर्ट मध्ये मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी समन्वय साधणारी वकिलांची टीम राज्यभरातील अभ्यासक,मराठा आरक्षण विषयातील कायदेतज्ञ, समन्वयक, आंदोलक सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे.
तरी या बैठकीची एक आचारसंहिता सुद्धा असणार आहे तीच पालन करूनच ही बैठक पूर्ण शिस्तीत पार पडेल याची दक्षता ही आपली सर्वांची जबाबदारी असणार आहे, असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
सिंहावलोकन परिषद पार पडल्यानंतर सायंकाळी 5 वाजता एकसूत्री धोरण आणि पुढील भूमिका ही पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येणार आहे.
आयोजक अॅड. राघवेंद्र बोधले, अॅड.तानाजी चौधरी,अमोल सिरसाट, संकेत सूर्यवंशी, विष्णू इंगळे,संदीप इंगळे,ओम सूर्यवंशी, वैभव मोरे, बप्पा पवार तसेच सकल मराठा समाज उस्मानाबाद आणि महाराष्ट्र
अशी माहिती,निमंत्रक - अविनाश खापे (मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती प्रमुख महाराष्ट्र) यांनी दिली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा