Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

डॉ.संतोष वाडीले यांचा दोंडाईचा नगर परिषदेकडून सन्मान...! नपाचे मुख्याधिकारी, सभापती व नगरसेवक यांच्या उपस्थितीत...!


      
दोंडाईचा प्रतिनिधी दि.२६/१०/२० दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेचे निवृत्त कर्मचारी रोहिदास वाडीले यांचे सुपुत्र डॉ. संतोष वाडीले यांनी DNB Pediatrician in Cardiology ( लहान मुलांच्या ह्रदय शस्त्रक्रियाशास्र ) ह्या विषयात दक्षिण भारतातील चेन्नई येथुन विशेष नैपुण्य मिळवुन पदवी पात्र केली म्हणुन माजी मंत्री तथा आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्यातर्फे दोंडाईचा शहर भाजपातर्फे शहराध्यक्ष प्रविण महाजन व पदाधिकारी यांनी शाल ,श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान केला .

याप्रसंगी प्रविण महाजन यांनी बोलतांना सांगितले की, दोंडाईचा शहरातील नगरपलीकेचे निवृत्त कर्मचारी रोहिदास वाडीले यांनी सर्वसाधारण जीवन जगुन आपली सेवा देताना आपल्या सुपुत्रास उच्च विद्या विभुषीत केले. ही बाब निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. 

डॉ. संतोष वाडीले यांनी कोकीलाबेन रुग्णालयात आपले अनुभव घेऊन डॉ नानासाहेब टोणगांवकर यांचा आदर्श घेऊन दोंडाईचा शहर व परिसरातील जनतेची सेवा करावी  असे सांगितले.

कार्यक्रमास दोंडाईचा नगरपलीकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम , आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे,माजी भाजपा शहराध्यक्ष सनजय तावडे,नगरसेवक हितेंद्र महाले, कृष्णा नगराळे,नरेंद्र गिरासे ,भरतरी ठाकुर,खलील बागवान,रोहिदास वाडीले,प्रविण वाडीले सर इ. मान्यवर उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध