Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने निषेध...!



शिरपूर (प्रतिनिधी) माजी मंत्री राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने शिरपूर येथे उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील दलित परिवारातील अल्पवयीन मुलीवर काही गुंड प्रवृत्तीच्या नराधम युवकांनी अमानुष बलात्कार केला त्या घटनेचा निषेध करीत धुळे जिल्हा येथिल शिरपूर तालुक्याचे  वतिने तहशिलदार साहेबांना  निवेदन देण्यात आले..
     
सदरच्या निवेदनात या घटनेचा निषेध करुन घटनेबाबत माहिती देतांना नराधमांनी बलात्कार करून सदर पीडितेचे हातापायाची हाडे तोडली, जीभ कापली व गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आज ती हयात नसली तरी तिने मृत्यूआधी पोलिसांना दिलेल्या जबाबात अमानुष घटनेचे कथन केलेले आहे. 

त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब आरोपींना अटक केली. दलित परिवारातील कुमारी आपल्या शेतात गुरांना चारा देण्यासाठी जात असताना नराधम गुंडांनी कायद्याची भीती न बाळगता हे दुष्कृत्य केले आहे अशा नराधमांवर फास्ट ट्रॅक न्यायालयात दावा दाखल करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी या संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष, माजी समाजकल्याणमंत्री, चर्मकार हृदयसम्राट मा. श्री. बबनराव (नाना) घोलप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघ या संघटनेने करून पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. 

या वेळी सोशल डिस्टनसींग पाळत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्यकार्यकारणी सदस्य मा.श्री सुरेशभाऊ आहिरे नगरसेवक शिरपूर शहराध्यक्ष श्री अशोक रखमे. श्री नरेंद्र महाले तसेच मातंग सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष:श्री नितीन गायकवाड जिल्हा अध्यक्ष:-विश्राम मरसाळे श्री दिलीप बाशिगे श्री दिलीप मांडोळे श्री सुनिल सोनवणे आदी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध