Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
जामनेर शहरातील ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल दि.13 रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण...!
जामनेर शहरातील ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल दि.13 रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण...!
जामनेर प्रतिनिधी: जामनेर शहरातील ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल चे उद्घाटन दिनांक 13 रोजी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.आज दि.11 रोजी भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी आ.महाजन यांनी मार्गदर्शन करत असताना सांगितले की जामनेर शहरातील व परिसरातील नागरिकांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल सुरू होत आहे.
या हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली सर्व आजारावर उपचार होणार असून नामांकित डॉक्टरांच्या माध्यमातून टेलीकन्सल्टिंग द्वारे ऑपरेटिंग होणार आहे. 200 बेड 30 व्हेंटिलेटर 4 ऑपरेशन थेटर सर्व बेड ला ऑक्सिजन असून अद्यावत सुविधा आहे .
जसे हॉस्पिटलमध्ये आय.सी.यू, पॅथॉलॉजी, एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, डायलिसिस मशीन, केमोथेरपी या सारख्या आजारावर उपचार होणार आहे.
आता आपल्याला पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी जाण्याची गरज नसून तेथील डॉक्टर टेलीकन्सल्टिंग द्वारे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा नागरिकांना खूप कमी खर्चात मोठा फायदा होणार आहे.तसेच सर्व सरकारी योजना जसे आयुष्यमान भारत, महात्मा ज्योतिबा फुले, राजीव गांधी या सर्व योजनांचा यामध्ये समावेश असेल.
या हॉस्पिटलमध्ये सर्व मशनरी या नवीन असून अद्यावत असे ऑपरेशन थेटर आहे. अशी माहिती आ.गिरीश महाजन यांनी दिली. सूत्रसंचालन रवींद्र झाल्टे यांनी व प्रास्ताविक रामेश्वर नाईक यांनी मांडले यावेळी गोविंद अग्रवाल ,चंद्रकांत बाविस्कर,शिवाजी सोनार, जितेंद्र पाटील श्रीराम महाजन,शरद पाटील प्रशांत, भोंडे,अनिस शेख ,बाबुराव हिवराळे, दीपक तायडे ,आतिष झाल्टे, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा