Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची रावेर तालुका कार्यकारिणी जाहीर...!
प्रतिनिधी रावेर: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्य संघटक संजय भोकरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभाग अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने रावेर तालुका अध्यक्षपदी पत्रकार विलास ताठे तर रावेर शहर अध्यक्ष पदी विनोद कोळी यांची निवड करण्यात आल्याचे पत्र ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके यांनी आज दि. २१ ऑक्टोबर रोजी दिले आहे.
त्यांचं प्रमाणे विलास ताठे रावेर तालुकाध्यक्ष यांनी रावेर तालुका कार्यकारणी जाहीर केली,ती खालीलप्रमाणे
तालुका उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष
योगेश सैतवाल, सचिव दिलीप भारंबे, जगदीश वासुदेव चौधरी, सहसचिव जगदीश चौधरी, तालुका संघटक प्रदिप महाराज, विनायक संजय जहुरे सहसंघटक,
अनिल मानकरे प्रसिध्दी प्रमुख तर सदस्य सरदार पिंजारी, मनीष चव्हाण, हमीद तडवी, आनंदा भालेराव यांची सदस्य पदीं
निवड करून नियुक्ती पत्र करण्यात आली.
या निवडीबद्दल खान्देश विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे,माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, नितीन पाटील, विसपुते, मुकेश जोशी, सुनील भोळे, संतोष ढिवरे,भरत काळे,नरेश बागडे, रितेश माळी,दिपक सपकाळे, अभिजित पाटील, संजय तांबे, नाजनीन शेख, चेतन निबोळकर, बाळू वाघ, मिलिंद सोनवणे,स्वप्नील सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा