Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम2020-21, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे !!!
प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम2020-21, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे !!!
उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.23 सन2020-21 रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणेसाठी राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे प्रधानमंत्री पीक विमा योजनेस मान्यता दिलेली आहे.
पिक विमा योजना हि कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असुन कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी पर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करणे बाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे. जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत. त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.
या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकासाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे ते पिक शेतात पेरल्या बद्दलचे स्वयंघोषणापत्र, सात बारा उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक च्या झेरॉक्स प्रतिसह नजिकच्या बँकेत अथवा आपले सरकार सेवा केंद्रावर,मान्यताप्राप्त सी.एस.सी केंद्रावर विमा हप्ता भरुन पिक संरक्षित करावे.
पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी अधिक माहीतीसाठी PMFBY.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजिकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा