Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०
मानेनगर रेंदाळ मध्ये कचऱ्याचे साम्राज्य हटवण्यास सुरुवात...!
हुपरी प्रतिनिधी : हुमायुन नदाफ कोरोनाच्या महामारी मुळे प्रत्येक जण आपले आरोग्य जपत असताना रेंदाळ येथील श्री विठ्ठल रखुमाई संतसेना महाराज मंदिरच्या मागे मानेनगर मधील कचऱ्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे अनेक डेंगू व चिकनगुणीया सारखे रोग पसरत आहे.
आठ ते दहा जणांना चिकनगुणीया झाला असुन साप, डुक्करे , कुत्र्याचे प्रमाण जास्त झाले आहेत त्यामुळे तात्काळ जीसीपी च्या सहाय्याने कचरा खणीत धकलुन परिसर स्वच्छ करण्यात आला असून मा.लोकनियुक्त सरपंच म्हणाले की याठिकाणी खण भरुन इथे जागेची मोजणी करुन जागेच्या भोवती कंम्पाऊट करुन घेऊन लहान मुलांना खेळण्यासाठी बगीच्या करु असे सांगण्यात आले.
परिसरातील खाणीमध्ये घरगुती कचरा टाकला जात होता. हा कचरा साचल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत लोकनियुक्त सरपंच विजय माळी यांच्या सहकार्यातून खाणीमधील घरगुती कचरा जेसीबीच्या हटवण्यात आला. यावेळी लोकनियुक्त सरपंच विजय माळी , पोपटराव पाटील , नारायण सुतार , सर्जेराव निकम , प्रकाश निकम , मलिक नदाफ , सुनिल नरदे , संतोष चिप्रिकर , प्रकाश निकम , वेदांत कुलकर्णी आदि उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा