Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
मानसिक आजारी लोकांशी भेदभाव नको एकटी,अवनि संस्थेचे 'जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त' पोस्टरद्वारे प्रबोधन
मानसिक आजारी लोकांशी भेदभाव नको एकटी,अवनि संस्थेचे 'जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त' पोस्टरद्वारे प्रबोधन
कोल्हापूर प्रतिनिधी : हुमायून नदाफ
मानसिक आजारी लोकांशी भेदभाव नको, मानसिक आजाराबाबत उपचारासाठी मदत करा, असे प्रबोधन एकटी, अवनि संस्था व न्यु कॉलेज समाजशास्त्र विभाग यांच्यावतीने करण्यात आले. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आज सकाळी अकरा वाजता दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात आली.
मानसिक आजाराबाबत असलेल्या गैरसमजुतीमुळे आजारी लोकांशी भेदभाव केला जातो, त्यांना वेडे ठरविले जाते. यामुळे त्यांना योग्य उपचार मिळत नाही, परिणामी बरे होणारे आजार वाढतात. अशा परिस्थितीत मानसिक आजारी व्यक्तींना कुटुंब, घर, गावातून बेघर व्हावे लागते. असे लोक एकटी संस्थेच्या बेघर निवारा केंद्रात आणले जातात. त्यांच्यावर योग्य उपचार व निवारा देऊन त्यांना बरे केले जाते.
त्यांचे पुनर्वसन केले जाते. परंतु समाजातील इतर काही घटकांकडून अशा आजारी लोकांना मदत मिळत नाही. त्यामुळे जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून पोस्टरद्वारे प्रबोधन करण्यात आले.
यावेळी मानसिक आजारी लोकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, मानसिक आजार हा वेडेपणा नाही, भेदभाव नको मदत हवी, मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ, मानसिक आजारी लोकांना चांगली वागणूक द्या, अशा आशयाची पोस्टर घेऊन कार्यकर्ते दसरा चौकात उभे होते.
या उपक्रमामध्ये न्यु कॉलेजच्या समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. अर्चना जगतकर, एकटी संस्थेच्या अनुप्रिया कदम, पुष्पा कांबळे, अभिजित कांबळे, पूजा बारड, जगदीश कांबळे, रविराज कांबळे,अवनी संस्थेचे सचिन ठाणेकर, जैनुद्दीन पन्हाळकर, शाहरुख आटपाडे, साताप्पा मोहीते, अमर कांबळे, वनिता कांबळे, अन्नपूर्णा कोगले, ओमकार व्हटकरआदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा