Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०
मोटार सायकल चोरणारे दोघेजण पोलिसांच्या जाळयात...
हुपरी प्रतिनिधी: हुमायून नदाफ
हुपरी ते कोल्हापूर जाणारे रोडवर हॉटेल वृंदावन समोरुन पार्किंगमधुन मोटर सायलक चोरुन नेलेल्या चोरट्यांचा शोध घेवुन त्यांना अटक करुन त्यांच्याकडुन 3 मोटर सायकल जप्त करणेत आले आहेत.
हॉटेल वृंदावन येथे लक्ष्मण बिरु बोरगावे रा. पट्टणकोडोली ता. हातकणंगले हे मोटर सायकल क्र. एमएच 09 वाय 2294 तेथे हॅन्डल लॉक करुन हॉटेलमध्ये गेले असता सदरची मोटर सायकल चोरीला गेली असल्याची बोरगावे हुपरी पोलीस ठाणे येथे फिर्यादी दिली होती.
प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक आर बी मस्के यांनी तात्काळ गुन्हयाची उकल करुन गुन्हा उघडकीस आणले.सीसीटीव्ही फुटेज तसेच बातमीदार यांचे मार्फत बातमी मिळवुन बोरगाव ता.चिक्कोडी राज्य कर्नाटक येथील 1) शहेनशहा नियाज पांगरे व व 33, 2) संदीप परसु शिंदे व व 30 यांना अटक करुन त्यांचे कडुन सदर गुन्हयात चोरीस गेलेली मोटर सायकलसहीत अन्य 2 मोटर सायकल जप्त करण्यात आले आहे.
सदर कारवाई ही पोलीस निरीक्षक आर बी मस्के याचे मार्गदर्शनाखाली प्रल्हाद कोळी, सचिन सावंत, फैयाज अत्तार, नितेश कांबळे, दिपक कांबळे यांनी केलेली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा