Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

वैद्यकीय अधिष्ठता ते पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल- डॉ.माधुरी कानीटकर..


   स्री शक्तीचा गौरव करणारा नवरात्रोत्सव यावर्षी कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणे साजरा होत आहे.तरुण गर्जना नवरात्रोत्सव स्पेशल ''जागर नवदुर्गाचा,सन्मान स्री शक्तीचा''अंतर्गत आपल्या कर्तुत्वाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नवदुर्गाचा परिचय आपण करून घेणार आहोत.

   नवरात्रोत्सव म्हणजे स्त्री शक्तीच्या गौरवाचा सण. वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वत:चे स्थान निर्माण करणार्या कर्तत्वान स्त्रीयांचा गौरव केला जातो. त्यामध्येच एका शिस्तप्रिय,कर्तव्यदक्ष  स्त्रीशक्तीचे कार्य आजच्या मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे,  त्या म्हणजे ‘डॉ. माधुरी कानीटकर’
    लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या भारतीय लष्करातील डॉक्टर आहेत.पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या पहिल्या महिला अधिष्ठाता आहेत. लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत पोहचणार्‍या त्या भारत देशातील तिसऱ्या, तर राज्यातील एकमेव महिला ठरल्या आहेत. त्याचबरोबर त्या पंतप्रधानांच्या सायन्स टेक्‍नॉलॉजी सल्लागार समितीत असणाऱ्या एकमेव डॉक्‍टर ठरल्या आहेत.

   त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून तर वैद्यकीय शिक्षण बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण झाले आहे. वैद्यकीय पदवी संपादन केल्यावर त्यांनी लखनौ येथे लष्करी प्रशिक्षण घेतले. वैद्यक शास्त्रातील पेडियाट्रिशिअन विषयात त्यांनी एम. डी. ही पदवी घेतली. तर पेडियाट्रिक नेफ्रॉलॉजीचे प्रशिक्षण दिल्लीतील एम्स येथून पूर्ण केले.

    भारतीय लष्करातील त्या पहिल्या प्रशिक्षित पेडियाट्रिक नेफ्रोलॉजिस्ट आहेत. पुणे आणि दिल्ली येथे त्यांनी मूत्रपिंडांच्या विकारांवर उपचार करणारी केंद्रे उभारली. सिंगापूर तसेच रॉयल कॉलेज, इंग्लंड येथून त्यांनी या विषयातील विशेष प्रशिक्षण घेतले आहे. ए.एफ.एम.सी.मध्ये प्राध्यापक,आणि शिशुरोग विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच अनेक विद्यापीठात परीक्षक म्हणूनही काम केले आहे. कानिटकर यांनी विविध  पुस्तकात १५ प्रकरणे लिहिली आहेत.  त्यांचे अनेक संशोधन प्रकाशित झाले आहेत. २०१७ मध्ये ए.एफ.एम.सी. मध्ये अधिष्ठाता म्हणून रुजू झाल्यावर तेथे वैद्यकीय संशोधन केंद्र  त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.एक  महीला अधिष्ठता म्हणुन त्यांनी न डगमगता जबाबदारी पार पाडली. 
          
    आज आपण पाहात आहोत लष्कर सेवेमध्ये काम करणार्या स्त्रीयांचे प्रमाण फ़ार कमी आहे.आजही या लष्करी क्षेत्रामंध्ये पुरूषांचे प्रमाण जास्त आहे. मात्र डॉ. कानीटकर यांनी  लेफ्टनंट जनरल या पदावर घेतलेली गरूड़ झेप लष्कर सेवेत करीअर करणार्या मुलींसाठी आदर्श आहे. डॉ. कानिटकर यांनी आरोग्य सुवीधा , पुर्ण स्टाफ़ नाही, अतिशय कठीण परिस्थीती मध्ये हॉस्पिटल नसलेल्या ठिकाणी बराकीत राहून सुद्धा सैनिकांना आरोग्यसेवा दिली.आसाम,अरुणाचल प्रदेश या बरोबर दक्षिण आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी त्यांनी काम केले. डॉ. माधुरी कानिटकरांचे पती राजीव कानिटकर हे सुध्दा लेफ्टनंट जनरल आहेत. परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक विजेते आहेत.

   डाॅ. माधुरी कानिटकर यांना १९८२ मध्ये अभ्यास आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक तसेच कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि बालकांच्या काळजीसाठी दिलेले योगदान यासाठी २०१४ साली विशिष्ट सेवा पदक व २०१८ साली अति विशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आलेले आहे.

   एका ध्येयावर प्रेरित होऊन, स्वंयप्रेरणने आपले लेफ्टनंट जनरल चे स्वप्न पुर्ण करून  डॉ. कानिटकर यांनी समाजासमोर खुप मोठा आदर्श उभा केला आहे. कौटुंबीक बंधनामुळे काही मुली आपले स्वप्न पुर्ण करू शकत नाहीत. चुल आणि मुल ही संकल्पना बाजुला ठेऊन ग्रामीण भागातील  मुलींनी सर्व बंधनाला झुगारून डॉ. कानिटकर यांच्या विचारांची प्रेरणा घेतली पाहीजे.
       तर चला मग दुर्गेरूपी प्रत्येक महीला व मुलींचा, आदीशक्तींचा सन्मान करूया, सशक्त भारत घडवुया.

 प्रखर संघर्षाला सलाम...!

    ✍️ शब्दांकन:- डॉ.राहूल शिंदे ,बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध