Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२०
मजूरांना घेऊन जानारे मिनिडोअर पलटी,२० मजूर जख्मी पैकी दोन गम्भीर
शेगाव ( प्रतिनिधी उमेश राजगुरे) शेगांव-कालखेड मार्गावर सकाळी ९:३० च्या सुमारास परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या मिनीडोअर पलटी झाल्याची घटना दि.२० ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३०.वा दरम्यान घडली या अपघातात २० मजूर जखमी पैकी दोन गंभीर जखमी जखमी झाले आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की शेगांव येथील एम.एच २८,एबी, ०७१४ या क्रमांकाच्या टाटा एस वाहनातून सकाळी कालखेड रोडवरील एका शेतात सोयाबीन सोंगण्यासाठी जात असतांना शहरानजीक काही अंतरावर बैल गाडीला वाचविण्याचे प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मिनीडोअर उलटले यामध्ये २० मजूर जखमी झाले आहे.
जखमींना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्नालयात हलविण्यात आले असता दोन गंभीर जखमी रुग्णाना तात्काळ पुढील उपचारा करीता अकोला येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताने पुन्हा एकदा मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मजुरीसाठी मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात ५० च्या जवळपास आलेले मजूर शेगाव तालुक्यातील मानेगाव येथे राहत होते. यातील मजुरांना घेऊन जातांना समोरून येणाऱ्या बैल गाडीला वाचविण्याचे प्रयत्नात वाहन पलटी झाले. मात्र यावेळी सईबाई मोटे सामान्य रुग्णालयातील तज्ञ डाँक्टर नेहमी प्रमाणे गायब होते.
येथील अधिकारी व महत्वाचे डाँक्टर मुख्यालयीन राहत नसल्यामुळे रुग्णांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकाची मागणी आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा